Sunday, December 5, 2010

14) शिवरायांचे वंशज राजश्री शाहू महाराज कोल्हापूर यांचे मत...

संदर्भ - आज्ञापत्र क्रमांक - ३८१ (१२/१०/१९२०)
            (मुलकी खाते ठराव करा. ४९०)
            "शाहू छत्रपती निवडक आदेश" - भाग २ रा  प्रकाशक - पुराभिलेख विभाग, महाराष्ट्र शासन.

 माझे मत - छत्रपती शाहू महाराजांच्या वरील आज्ञापात्रातून स्पष्ट पणे राजश्रींनाही त्या काळी रामदास आणि दादोजींचे गुरु पद म्हणजे ब्राह्मणांची क्लृप्ती वाटत होती असे दिसून येते.. त्या बरोबरच त्यांनी रामदास आणि दादोजी ह्यांच्या गुरुपदाचे संदर्भ मिळत नाहीत असेही वर्णिलेले आहे..व त्या बरोबरच शिवाजी महाराजांचे खरे गुरु हे मौनी महाराज हे होते असेही नमूद केलेले आहे...मौनी महाराजांच्या संदर्भातील अनेक पुरावे  ९१ कलमी बखरीत मिळतात..परंतु विषय हा रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज ह्यांच्या संबंधा वरचा आहे.. त्या मूळे विषयांतर नको ह्या हेतूने मौनी महाराजांबद्दल सविस्तर माहिती इथे देत नाही..
  राजश्री शाहू महाराजांचे कार्य हे सर्व श्रुतच आहे.. त्या काळात ब्राह्मण समाजातील काही मंडळींची वागणूक तशी असावी म्हणून महाराजांनी ब्राह्मण समाजाचे वर्चस्व जुगारून देण्यासाठी जे अनेक प्रयत्न केले त्यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे "क्षात्र जगत गुरु पिठाची" स्थापना.. ती देखील शिवरायांचे खरे गुरु मौनी महाराज ह्यांच्या मठाच्या जागीच (जो मठ स्वतः शिवरायांनी आणि नंतर संभाजी महाराजांनी व राजाराम महाराजांनी बांधून घेतला = शिवरायांच्या काळात सुरवात- संभाजी महाराजांच्या काळात बांधकाम चालूच राहिले, आणि राजाराम महाराजांच्या काळात पूर्णत्वास आले..) स्थापना केली त्या बद्दलचे वरील आदेश पत्र आहे...
    शाहू महाराजांनी तत्कालीन एक प्रयत्न केला होता..रामदास आणि दादोजी ह्यांना बळजबरी पणे शिवरायांच्या गुरु पदावर बसवण्याचे उपद्रव हे त्या काळीही खूप झाले असावेत.. म्हणूनच शाहू महाराजांनी वरील आज्ञा पत्रात तसा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.. की रामदास आणि दादोजी यांचे गुरु पद हि ब्राह्मनांचीच एक क्लृप्ती आहे (छल कपट / लबाडपणा आहे) त्यावर उपाय म्हणून महाराजांनी मौनी महाराजांचे कार्य जे विस्मरनास गेले आहे ते वरती आणण्याचा प्रयत्न केला...
                 आजही तोच प्रकार ह्या न त्या स्वरुपात चालूच आहे.. खुद्द शाहू महाराजांनी एवढे प्रयत्न करूनही आज रामदास आणि दादोजी यांचे खोटे गुरुपद का मिरवले जाते.. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधले तर.. कुठे तरी आपल्याच लोकांचे अज्ञान अथवा अजागृकता असे उत्तर मिळेल...आपली माणसे हि इतिहास लिहिण्या आणि वाचण्या पेक्षा इतिहास घडवन्यातच जास्त धन्यता मानतात.. पण त्या मूळे इतिहास लिखाणात आणि वाचनात झालेल्या दुर्लक्षतेचा फायदा काही रामदास आणि दादोजी भक्तांनी घेऊन स्वतःचे साधून घेतलेले आहे...अजून किती दिवस आपण त्या रामदाशी आणि दादोजींच्या भक्तांच्या लबाडीला बळी पडणार आहोत...बहुसंख्य जनतेने रामदासी आणि दादोजींच्या लबाड भक्तांवर विश्वास नाही ठेवला तर हे असले प्रश्न निर्माणच होणार नाही...त्या साठी मग इतर कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवा असेही नाही.. जागरूकतेने  आणि डोळ्यांवर कोणत्याही एका प्रकारचा चष्मा न घालता इतिहासाचे वाचन करा...आपल्या लोकांवर विश्वास ठेवायला शिका...

Monday, November 22, 2010

13 ) रामदासी शिष्यांचा अजून एक छुपा डाव...

 प्रतापगड युद्ध विषयीची एक बोगस ओवी

विवेकेकरावेकार्य साधन |
जाणार नरतनु हे जाणोन |
पुढील भाविष्यार्थी मन|
रहाटोंची  नये ||१||
चालों नये असन्मार्गी  |
सत्यता बाणल्या आंगी |
रघुवीर कृपा ते प्रसंगी |
दास महात्म वाढवी ||२||
रजनीनाथ आणि दिवाकर|
नित्यनेमे करिती संचार|
घालीताती येरझार |
लाविले भ्रमण जगदिशे ||३||
आदिमाया मूळ भवानी|
हेची जगताची स्वामिनी|
एकांती विवेके धरुनी |
इष्ट योजना करावी ||४||
                                (प्रतापगडचे युद्ध. पृ. ६७ )

अफजलखान विजापुराहून निघाल्यानंतर तिथल्या रामदास स्वामीच्या शिष्याने एका ओवीद्वारे त्याची माहिती शिवरायांना दिली अशी एक आधुनिक काळात तयार केलेली ओवी "प्रतापगडाचे युद्ध" या पुस्तकात प्रथम छापण्यात आली होती.
       या ओवीरूपी पत्राचा नेमका उगम कोठून झाला याविषयी माहिती मिळत नाही. प्रतापगडचे युद्ध या पुस्तकाचे लेखक मोडक यांनी हि ओवी रामदास व रामदासी या धुळे येथून प्रकाशित होणाऱ्या पाचव्या अंकातून घेतल्याचा संदर्भ दिलेला आहे. (मूळ संदर्भ -१). तर त्याच अंकाच्या सतराव्या भागात हि ओवी ज्ञानप्रकाश किंवा मिरजेतील शिवचरित्रात छापल्याचे लिहिलेले आहे. पण या ज्ञानप्रकाशाच्या अंकाचा किंवा मिरजेतील शिवचरित्राचा नेमका संदर्भ दिलेला नाही. या संदर्भातील लिखाण हे केवळ आठवणींच्या आधारे लिहिलेले आहे. (मूळ - संदर्भ - २)
      
या ओवीतील भाषा शिवकालीन नसून उत्तर पेशवाईतील  आहे. या सर्व गोष्टींमुळे हि ओवी बनावट आहे हे सिद्ध होते. शिवाय १६५९ च्या दरम्यान रामदास स्वामींच्या मठांचा आणि शिष्य संप्रदायाचा प्रसार आदिलशाहीच्या राजधानीपर्यंत पसरण्या येवढा मोठा झालेला न्हवता . शिवाजी महाराजांचा व रामदास स्वामींचा संबंध १६७२ नंतर आला होता. तोपर्यंत शिवरायांना समर्थ रामदास कोण हेच माहिती न्हवते. पण पेशवाईतील समर्थ भक्तांनी शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे संकल्पक आणि मार्गदर्शक रामदास स्वामी होते हे सिद्ध करण्यासाठी अशी अनेक बनावट पात्रे, ओव्या तयार केल्या होत्या. उत्तर पेशवाईत लिहिलेल्या हणमंत स्वामींची बखर नावाने प्रसिद्ध असलेल्या बखरीत तर शिवराय व रामदास यांच्या संबंधातील अनेक भाकड कथांचा भरणा केला आहे. या बखरीत रामदासांना दो अंगुले पुच्छ असल्याचे लिहिले आहे. यातून समर्थांचा आणि शिवरायांचा मोठेपणा सिद्ध होत नाही तर त्यांच्या महान कर्तुत्वाला , त्यांच्या चरित्र-चारित्र्याला आपण विकृत , खुजे करत आहोत याचे भानही अश्या ओव्या, कथा रचणाऱ्या, सांगणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांना राहत नाही.
        अशा पद्धतीने एका संन्याशाकडून  सूचना घ्याव्यात इतका भोंगळ कारभार शिवरायांचा न्हवता. स्वराज्याचे हेर खाते अत्यंत प्रगत - जलद आणि सबल होते. याचे दाखले शिवचरित्राच्या पाना- पानात आपणास दिसून येतात, अश्या पद्धतीचा काल्पनिक अभंग रचण्याचा व पुन्हा पुन्हा सांगणाऱ्या छापणाऱ्या व्यक्ती शिवरायांना, त्यांच्या हेरखात्याला कमीपणा देतात., हे आपण समजून घेतले पाहिजे आणि म्हणूनच हा अभंग या परिशिष्टात देऊन हे स्पष्टीकरण करावे लागले आहे.

लेखातील मूळ संदर्भ -- १) प्रतापगडाचे युद्ध पृ- ६७
                                   २) रामदास व रामदासी भाग सतरावा, १८४२ चैत्र सुद्धा , पृ. १८५



--लेखाचा संदर्भ - परिशिष्ट - १
   प्रतापगड युद्धाविशायीची एक बोगस ओवी --
   प्रताप गडाची जीवन गाथा - पृ. ३ - लेखक इंद्रजीत सावंत..


..(माझे मत -- रामदासी शिष्य कसे छुप्या पद्धतीने हळूच खोटे असलेले संदर्भ देखील खपवतात ह्याचा उलघडा इंद्रजीत  सावंतांनी त्यांच्या पुस्तकातून केलेला आहे...
              इंद्रजीत सावंतांनी त्या खोट्या ओवीचा संदर्भ ज्या वेळेस तपासून बघितला तेव्हा.. त्या पुस्तक कर्त्याने रामदासी अंकाचा संदर्भ दिला.. पण मुळात रामदासी अंकात मात्र ह्या ओव्यांचा स्पष्ट असा नेमका संदर्भ दिलेला नाही..आणि त्या संदर्भातील लिखाण आठवणींच्या आधारे लिहिलेले आहेत..
ह्यावरून हे रामदासी शिष्य हळूच एखादा बनावट पुरावा आणतात. कुठल्यातरी मासिकात..नाहीतरी पुस्तकात छापतात.. मग काही वर्षे उलटून गेलीत कि दुसरे पुस्तक लिहितांना तेच पुस्तक आपल्याला संदर्भ म्हणून दाखवतात...आणि अश्या अनेक पुस्तकांचे संचय त्यांच्या कडे झालेले असणार.. त्या मूळे मित्रांनो रामदासी शिष्यांच्या ह्या असल्या ओव्यान पासून सावध राहा..
       ... मुळात एकदा मनात स्पष्ट झाले कि ह्या वरील ओव्या बनावट आहेत... मग पुढे विचार करायचा तो असा ....की.. असल्या बनावट ओव्यांच्या निर्मिती मागे काय बरं कारण असावे...????  रामदासांचे स्वराज्यातील योगदान ह्या न त्या स्वरुपात दाखवण्यासाठी हे सगळे खटाटोप...
इंद्रजीत सावंतांसारख्या इतिहास संशोधकांनी ओव्यांचे संदर्भ तपासायचे खटाटोप केले.. अन्यथा सर्व सामान्यांनी ते केले नसते..आणि त्या ओव्या सत्यच आहेत असे प्रमाण मानून.. रामदासांचे गोडवे चुकीच्या कारणांसाठी गायला आपली मंडळी सज्ज झाली असती...रामदासी शिष्यांच्या भूल थापांना आपली लोक लगेच फसतात...वेळीच जागृत व्हा.. नाही तर.. उद्या तुमच्या पूर्वजांचे नाव देखील तुमच्या वंशाजांकडे पोहोचणाऱ्या इतिहासातून हळूच वगळले जाऊ शकेल.. त्या मूळे ह्या हळूच होणाऱ्या कारवायांकडे लक्ष द्या.. तुमच्या आजूबाजूला चुकीचा इतिहास पसरवनाऱ्यान वर लक्ष ठेवा...
पेशवाई काळात हळूच घुसवलेल्या इतिहासाचे
फलीतच म्हणजे रामदास स्वामी आणि दादोजीचे गुरुत्व आहे.. ते आपण कित्येक वर्षे डोक्यावर घेऊन मिरवत होतो...आपल्यातील काही शहाण्या लोकांनी बंडाळी उठवली म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कळल्या.. नाही तर आपणही रामदास आणि दादोजींना शिवरायांच्या गुरुपदी बसवून शिवराय राहिले बाजूला रामदास आणि दादोजिंचेच गोडवे गात बसलो असतो...आजही आपल्यातील काही मंडळी तेच करत आहेत,...आजूबाजूला त्याची उदाहरणे दिसून येतीलच...त्या मूळे निदान तुम्ही तरी सावध रहा.. आपल्या शहाण्या लोकांच्या मागे उभे रहा..त्यांच्या कडून मार्गदर्शन घ्या..इतिहासाचा अभ्यास स्वतः करा....चुकीच्या अफवांना  सडेतोड उत्तरे द्या....आणि चुकीचा पसरवनाऱ्याच्या विरोधात उभे रहा.. संघटीत व्हा...)

Tuesday, September 21, 2010

12) रामदाशी शिष्यांचे प्रयत्न.. आणि भगव्या रंगाचा वाद.....भास्करराव जाधवांनी केलेले खंडन..


""श्रीयुत सरवटे  हनुमद्भक्तीवरील प्रवचन अपूर्व आहे. हनुभक्त स्वार्थाला पारखा असतो व इतर देवांचा भक्त स्वार्थी असतो, असा त्यांच्या प्रतीपादनांतून आशय निघतो. यासंबंधाने रा. सरवटे म्हणतात :- 
     "हनुमंताच्या रामचन्द्राशी जडलेल्या संबंधाला गुणानवरील अनुरक्ती हे कारण असून, त्यापासून हिंदुस्थानातील लोकांनी घेतलेला धडा भगवत्भक्तीचा आहे. त्या संबंधाला देशद्रोहाचा रंग श्री. जाधवांच्या दृष्टीने दिला आहे. हनुमंताचे शिष्य होण्याने महाराष्ट्राची स्वधर्मावरील भक्ती दुणावली; स्फूर्ती प्रदीप्त झाली. त्याचीच फलश्रुती स्वराज्यप्राप्तीत झाली. मोगलांना मिळालेले, इंग्रजांना फितूर झालेले, किंवा त्यांच्या सैन्यात सामील झालेले लोक, या  हनुमद्भक्तीला पारखे असल्यामुळेच तिकडे गेले होते. या भक्तांचे त्यांच्याठायी असलेले धर्माविषयीचे औदासिन्य  हे त्यांचे शत्रूला मिळण्याचे कारण होते. स्वार्थ किंवा लोभ त्यांना शत्रुत्व मिळण्यास लावीत होता. तो स्वार्थ व लोभ हनुमद्भक्तीने इतरांमधून नाहीसा केला होता;" इत्यादी.
                 समर्थ रामदासांनी  हनुमद्भक्तीचा प्रसार केला व शिवाजीमहाराजांच्या हस्ते स्वराज्याची स्थापना केली अशी श्री सरवटे यांची समजूत दिसते. त्यांचे मते शहाजीराजापासून  पूर्वीचे देवगिरीच्या यादवांपर्यंत सर्व लोक  हनुमद्भक्तीस पारखे होते. पण शिवाजीनंतरचे मराठे हनुमद्भक्त झाल्याने त्यांच्या ठिकाणी स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान संचारून स्वराज्याची स्थापना झाली. याला पुरावा म्हणून प्रत्येक गावी मारुतीची स्थापना श्रीरामदासांनी केली असा जोसमज पसरवून देण्यात येत आहे, त्याचा आधार देण्यात येईल असे वाटते.
                 हनुमंत हा पूर्वीपासून द्रविडांचा एक प्रख्यात देव आहे, व त्याची देवळे पूर्वीपासूनची होती. श्रीरामदासांच्या पूर्वीपासूनची होती. श्रीरामदासांच्या शिष्य वर्गापैकी कोणीतरी आपल्या परमगुरुचे महत्व वाढविण्यासाठी रामदासांनी हि देवळे स्थापिली असा समज पसरवून दिला आहे. इ.स.१६७२ पर्यंत श्री शिवाजी व श्री रामदास यांची भेटच झाली न्हवती, हे आत्ता सिद्ध झालेले आहे. त्यावरून स्वराज्य स्थापण्याच्या कामी श्री रामदास व हनुमद्भक्ती यांचा संबंध न्हवता व त्या स्थापण्याचे श्रेय हनुमद्भाक्तीकडे देणे केवळ अंधश्रद्धेचे होईल. भोसल्यांचे घराणे रामभक्त झाले नाही. शिवभक्तच राहिले. शिखर शिंगणापूरचा महादेव हा त्यांचा कुलदेव आहे. व त्या देवांचे भगवे निशाण श्रीशहाजीने आपला झेंडा केला व श्रीशिवाजीने तोच चालू ठेवला. म्हणूनच तंजावरच्या राजवाड्यावर तो आजही फडकत आहे. श्रीरामदासास शिवाजीने राज्य अर्पण केले व राज्य दिल्याची चिठी  झोळीत टाकली व आपली छाटी म्हणून निशाण भगवे करण्यास समर्थांनी आज्ञा दिली, असा समाज रामदासी पंथाने पसरविला आहे. पण हे राज्यदान कल्पित आहे. भगवे निशाण करण्यास रामदासाने सांगितले हि गोष्ट बनावट आहे. श्रीरामदास हे ब्रह्मचारी असल्याने त्यांची कफनी व  छाटी हुरमुजी  रंगाची असे; भगव्या रंगाची नसे. मराठ्यांचे निशाण भगव्या रंगाचे आहे; हुरमुजी नाही. यावरून त्या निशाणाचा संबंध श्रीरामदासांशी लावणे म्हणजे वडाची साल पिंपळास  लावण्यासारखेच आहे.
               श्रीयुत सरवटे यांचे हे प्रवचन उत्कृष्ट गद्याचा मसाला म्हणता येईल. पण त्यातील विचार फोल आहेत. त्या विचारांचा आधार डळमळीत आहे. मराठ्यांच्या उत्कर्षाचे सर्व श्रेय हनुमद्भक्तीला देणे म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहे. ""


संदर्भ  --- रामायणावर नवा प्रकाश - "रामभक्त हनुमंत व धर्मात्मा बिभीषण" ह्या प्रकरणात वरील उल्लेख आलेला आहे.... लेखक -- श्री भास्करराव जाधव


माझे मत ---
वरील लिखाणाची पार्श्वभूमी --- भास्करराव जाधव यांनी जेव्हा त्यांच्या लेखनातून रामायणावर.. काही प्रश्न उपस्थित केल्यावर.. श्री सरवटे यांनी त्यांना भाषणातून दिलेले उत्तर.. आणि परत मग भास्करराव जाधवांनी त्यावर केलेली टिप्पणी... अश्या प्रकारचे वरील लिखाण आहे... वरील लिखाण ज्ञान मंदिर १-५-३५ मध्ये आलेले आहे....  १९३५ चे लिखाण आहे...
त्या काळातही रामदासांनाच स्वराज्याचे सर्व श्रेय देण्याचे प्रयत्न झालेत....(आजकाल हि ते चालूच आहेत...) ....विषय होता रामायणाचा.. सरवटेंनी तो -- राम -- मग हनुमान --- मग रामदास.--- मग स्वराज्य आणि शिवाजी महाराज असा वळवला.. त्याकाळीही असे प्रयत्न झालेले आहेत.. त्याला भास्करराव जाधवांनी चोख उत्तर दिलेले दिसून येते....
रामदासांचे शिष्य वर्ग रामदासांना कित्येक प्रकारे महान सिद्ध करण्याच्या नादात.. शिवाजी महाराजांचे कर्तुत्व.. कुठे तरी झाकोळायचा प्रयत्न करतात..... त्याचेच हे एक उदाहरण म्हणून दिलंय..... तसेच भास्कररावांनी मांडलेला भगव्या रंगा बाबतची आणि रामदासांच्या कफनी व छाटी यांच्या रंगा बाबत जो सवाल उपस्थित केला आहे तो योग्य वाटतो...

Sunday, August 29, 2010

11) महात्मा फुलेंच्या दृष्टीतील रामदास आणि त्यांचे तत्व .

सुख.....
यशवंत जोतीराव फुले :  प्रश्न - मानवप्राणी एकंदर सर्व जगात कशाने सुखी होईल?
जोतीराव गोविंदराव फुले : उत्तर-  सत्य वर्तन केल्याशिवाय मानवप्राणी जगात सुखी होणार नाही. याविषयी प्रमाण देतो.
***************************************************

यशवंत प्र.  - यावरून देशस्थ आर्य रामदास भट्टजीबुवाचा  श्लोक असा आहे की , " जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनी पाहे," याविषयी तुमचे काय म्हणणे आहे??
ज्योतीराव . उ . - देशस्थ आर्य रामदास भट्टजीबुवांनी या श्लोकावरून निर्मिकाने निर्माण केलेल्या पवित्र जगाविषयी व संसाराविषयी अज्ञानी शुद्रादी अतिशुद्रांचे मनात वीट भारावून तो सर्व व्यर्थ आहे, म्हणून त्यांनी निरीच्छ   व निरभ्रम होवून, परित्याग केल्याबरोबर धूर्त आर्य भटांनी त्यावर झोड उडवावी ; यास्तव हा श्लोक बुद्धया केला असावा. कारण आर्य रामदासास सत्य कशाला म्हणावे, हे केवळ आपल्या जातीमतलबासाठीच कळले न्हवते, असे मला वाटते. याविषयी मी तुम्हास एक प्रश्न करितो. त्याचे उत्तर देतांना आर्य रामदासाचा श्लोक कितपत खरा आहे, याविषयी तुम्हास सहज निर्णय करिता येईल..
यशवंत प्र.  - असा तुमचा प्रश्न काय आहे, तो आम्हास सांगाल , तर बरे  होईल.
ज्योतीराव. उ . - असे कोणते शुल्लक सार्वजनिक सत्य आहे कि, त्याचे आचरण केल्याने मानवप्राणी दु:खी  होतो.??
यशवंत प्र. - सत्यास स्मरून एकंदर सर्व सार्वजनिक सत्य, मग ते शुल्लक का असेना, पण त्याचे आचरण केल्याने कोणताही मानव प्राणी दुखी होणार नाही, असे शोधांती समजून आले; तथापि आर्य रामदासाने कोणच्या आधाराच्या जोरावर हा श्लोक कल्पिला असावा?
जोतीराव . उ . - याला जोर मूढ शुद्रादी अतिशुद्रांचे अज्ञान, व त्यांचा मतलबीपणा व धूर्तपणा होय. याविषयी धूर्त आर्य रामदासाने आपले ग्रंथात जे काही लिहिले आहे, त्यावरनिपक्षपाताने विचार करावा, यास्तव ते पुढे देतो.
***********************************************

यशवंत. प्र.  - रामदास हा अस्सल आर्य ब्राह्मण कुळातील असता, त्याने आपल्यास रामशर्मा पद न जोडिता अतिशूद्र सुरदासाचे पद आपले, नावास का जोडून घेतले? यातील इंगित काय असावे, हे तुम्ही सांगू शकाल काय?
जोतीराव. उ. - शिवाजी हा शुद्र जातीमध्ये मोठा योद्ध असून , अक्षरशुन्य  असल्यामुळे व  रामदास अट्टल धूर्त आर्य जातीतील साधू बनल्यामुळे, त्याने आपल्या नावास शर्मा असे पद जोडून न घेता, अतिशूद्र सुरदासासारखा आपल्यास रामदास म्हणवून घेऊ लागला. यातील मुख्य इंगित अज्ञानी शुद्र शिवाजीस खुश करणे होय. तात्पर्य, निर्मिकाच्या नावांवर धर्मासंबंधी दरवडे घातल्याने मात्र सुख होते, व बंडखोरापासून  अज्ञानी व पंगु मानवास सोडविल्यापासून अथवा निराश्रित अंध, पंगु व पोरक्या मुलीमुलास व इतर सर्व प्रकारच्या संकटात पडलेल्या मानव बांधवास साह्य देण्यापासून, मात्र सुख होत नाही, म्हणून म्हणणे केवळ एखाद्या नास्तीकाने जग निर्माणकर्त्यांचे  अस्तित्व नष्ट करण्याप्रमाणे होय.
                               (ह्या मध्ये जोतीरावांनी शिवाजी महाराजांना अक्षर शून्य अथवा अज्ञानी असे म्हटलेले आहे..ते रामदासांच्या दृष्टीकोनातून शिवाजी महाराज अक्षर शून्य अथवा अज्ञानी असे असावेत..म्हणूनच जसे..काही शिकले सवरलेले लोक..जे स्वतःला जास्त शिकलेले समजतात..ते गावाकडे गेल्यावर...गावच्या लोकांशी जवळीक साधण्यासाठी थोडे गावंढळ  भाषेत बोलतात..अर्थात ह्यात त्या शहरातील लोकांना गावातील लोक अज्ञानी आणि अक्षर शून्य वाटत असतात....त्या प्रमाणेच महात्मा जोतीरावांना इथे रामदासांचा दृष्टीकोन अभिप्रेत असावे...---माझे मत )
(********* - याचा अर्थ तिथे महात्मा जोतीराव फुल्यांनी श्लोक/ ओव्या  दिलेले आहेत...जागे अभावी आणि वेळे अभावी ते टाकलेले नाहीत....)
       (वरील जोतीरावांनी मांडलेल्या विचारावरून असे वाटते..की रामदासांनी शिवाजी महाराजांना खुश करण्यासाठी काही कृत्य केलेल्या आढळतात...तसेच..जोतीरावांना रामदासांनी मांडलेली सुखाची संकल्पना पटलेली दिसत नाही..उलट रामदासांनी केलेली सुखाची व्याख्या हि शुद्रादी अतिशुद्रांना फसवण्याच्या दृष्टीने ती तशी  लिहिलेली  आहे ..आणि तसे ते लिहिण्यामागील..अजून एक भक्कम कारण म्हणजे शुद्रादी अतिशूद्र लोकांचे अज्ञान, व रामदासांचा मतलबीपणा व धूर्तपणा होय....अश्या प्रकारचे मत जोतीरावांचे रामदास आणि त्यांच्या तत्वज्ञाना बद्दल होते...----  माझे मत..)
 

Thursday, August 19, 2010

10) रामदासी शिष्यांचा अजून एक पराक्रम

  'राया छञपती ऐकावे वचन| रामदासी मन लावी वेगा||
रामदास स्वामी सोयरा सज्जन| त्यासी तन मन अर्पी बापा||
मारुती अवतार स्वामी प्रगटला| उपदेश केला तुज लागी|
| "
काही बनावट लोक...... वरील तुकारामांच्या ओळींचा संदर्भ देऊन तुकारामांनी शिवरायांना रामदासांचे शिष्यत्व पत्करण्यास सांगितले असे संपूर्ण पणे खोटे..आणि बनावट गोष्टी...गैरसमज पसरवत सुटलेत....त्यावर नरहर कुरुंदकर ह्यांचे मत खाली वाचावे.... डोक्यात झणझणीत प्रकाश पडेल....

                         "तुकारामाने शिवाजीस रामदासांचा उपदेश घेण्याविषयी सांगितले. हीही थापच. रामदासी संप्रदाय १६४९ ला कायम झाला. चाफळच्या पंचक्रोशीबाहेर तुकारामांच्या हयातीत रामदासांचे नाव गेले न्हवते." --------------- नरहर कुरुंदकर...

(माझे मत -- बघा....रामदासी शिष्या कुठवर पोहोचले.. थेट तुकारामांच्या अभंगात स्वतःचे अभंग च्या अभंगच प्रक्षिप्त / खोटे घुसडले...  शब्दांची हेराफेर  ठीक होते ...पण इथे तर  नवीनच तयार केलेले अभंग टाकतांना हि मंडळी दिसतात  ...... केवढे प्रताप हे.. कशासाठी??? तर काहीही करून रामदास स्वामींना श्रेष्ठत्व मिळण्यासाठी..... नाहीतर असे करायची गरजच काय ह्याचा थोडा विचार करा.... )

9) रामदासी शिष्यांमध्येच दडलंय james laine प्रकरणाचे बीज....

 रामदासी बखरीत बरेच विकृत लेखन शिवाजी महाराजान बद्दल आलेले आहे....त्या बद्दल नरहर कुरुंदकर ह्यांचे मत बघुयात.....
------ एका रामदासी बखरीत म्हटले आहे कि, शिवाजीची आपणावर निष्ठा किती , हे पाहण्यासाठी स्वामींनी एकदा राजाची पत्नीच शृंगारून पाठविण्यास सांगितले. राजेही असे स्वामीभक्त कि, त्यांनी तत्काळ पत्नी शृंगारून पाठविली. समर्थांनी आशिर्वाद्पूर्वकराजपत्नीची परत पाठवणी केली व राजाच्या निष्ठेची प्रशंसा केली. हि कहाणी का नको? अशी आख्यायिका सांगणारे एकमुर्ख व त्या ग्रंथबद्ध करून ठेवणारे शतमूर्ख. ह्या दंत कथा दोन्ही महापुरुषांची बदनामीच करतात, इतकेही त्यांना कळले नाही !!           ------------ नरहर कुरुंदकर

(माझे मत --- रामदासी बखरेत अजूनही बरेच विकृत लिखाण आहे....जसे समर्थांसाठी वाघिणीचे दुध.....दगडातून बेडूक निघणे वगैरे वगैरे..... सगळ्या भंपक कथा आहेत....शिवाजी महाराजांच्या बदनामीचा हा एक तत्कालीन कटच म्हणावा लागेल..... स्वामी भक्ती अथवा निष्ठा तपासायचीच (कल्पित) होती तर पत्नीस शृंगारून पाठवा असे लिहिण्याची  काय गरज????  लिहिणाऱ्याने किती विकृत विचार केला असेल हे लक्षात घ्यायला हवे..... महाराजांनी आपल्या बायको मुलां पेक्षा स्वराज्याला जास्त किंमत दिली एवढेही ह्या मूर्ख लेखकांना उपजले नाही........आणि किती विकृत विचारातून रामदास स्वामींचे शिवाजी महाराजांच्या वरील श्रेष्ठ पणा सिद्ध करण्याची धडपड बघा.. महाराजांच्या पत्नीसही रामदासीशिष्यांनी  त्या प्रयत्नात सोडले नाही... 
हे हे इथेच आहे खरे james laine प्रकरणाचे बीज....इथूनच चालू होतेय ते बदनामीचे सत्र....बीज इथे रोवले गेले आहे..... त्याचे रोपटे आज इकडे तिकडे दिसत आहे.... इथे रामदासांना महान करण्याच्या धडपडीसाठी  महाराजांच्या पत्नीचा अपमान.... तर james laine प्रकरणात दादोजी कोंडदेव यांना महान बनवण्याच्या धडपडीत साक्षात महाराजांच्या मातोश्रींचा अपमान...)

इतिहासातील बनावटीकरणावर महात्मा फुलेंचे विचार..

८) महात्मा फुलेंनी इतिहासातील घुसखोरी  बद्दल, आगन्तुकी करणाबद्दल  , बनावटी करणा बद्दल एका पत्रात उल्लेख केलेला आहे...
मामा परमानंद यांस पत्र.....................
------------- मुक्काम पुणे त|| २ माहे जून १८८६ ई||
.........राजमान्य राजेश्री नारायणराव माधवराव परमानंद मु|| आंबेर
......................... साष्टांग नमस्कार वि.वि. आपले त|| ३० माहे गुदस्तचे कृपापात्र पावले. त्याचप्रे|| पुण्याचे हायस्कुलातील भागवतमास्तर यांनी शंकर तुकाराम यांनी छापलेला पवाडयाचे पुस्तकातील काही शाहिरांची एक याद मजला आणून दिली, यावरून मी त्यास येक वेळी कळवले कि, सदरचे पवाडयाची प्रत मजजवळ नाही आणि ती पाहिल्याशिवाय मला याविषयी काही कळविता येत नाही. नंतर त्यांनी ते पुस्तक मला आणून दिले नाही. सबब त्याविषयी मला काही आपल्यास लिहून कळविता आले नाही.
..................... फितुरी गोपिनाथपंताचे साह्याने शिवाजीने दगा करून अफजुलखानाचा (वध?) केला. तान्हाजी मालूसऱ्याने घोरापाडीचे साह्याने सिंहगड किल्ला काबीज केला व शिवाजीने पुण्यात दरोडा घालून मुसलमान लोकांस कापून काढले. या सर्वाच्या कच्च्या हकीकतीचे खरे पोवाडे माझे पाहण्यात आले नाहीत. आज दिनपावेतो युरोपियन लोकांनी जे काही इतिहास तयार केले आहेत , ते सर्व क्षुद्र आणि अतिक्षुद्रांची वास्तविक स्थिती ताडून न पाहता +++ झाकून आर्यं भटब्राह्मणांचे ग्रंथावर व भटकामगारांचे सांगण्यावर भरवसा ठेऊन इतिहास तयार केले आहेत. व अलीकडे भटब्राह्मणांची विद्वान पोरेसोरे नवीन पवाडे करून हळूच मैदानात आणीत आहेत. त्यापैकी माझे पाहण्यातही बरेच आले आहेत आणि त्यातील क्षुद्रानी कमावलेल्या मोत्यापोवळ्यांचा चारा चरणारे भागवती, गोब्राह्मनासह दादोजी कोंडदेवास फाजील आगन्तुकी करावयास लावल्यामुळे तसल्या बनावट पवाड्यांचा मी संचय केला नाही. 
.........आठ वर्षी जेव्हा मी मुंबईत आपले घरी भेटावयास आलो होतो, तेव्हा पांचगणीचे पाटील रामपासमक्ष आपल्यास क्षुद्र शेतकऱ्यांचे दैन्यवाण्या स्थितीचा काही देखावा जगापुढे आणणार, म्हणून कबूल केले होते. ते त्या देखाव्याचे असूड या नावाचे तीन वर्षापूर्वी एक पुस्तक तयार केले होते व त्याची एकेक प्रत आपले कलकत्याचे हरभास व अष्टपैलू गवरनर जनरल (साहेब?) श्रीमान महाराज बडोद्याचे गायकवाड सरकारास पाठविल्या आहेत. आमच्या क्षुद्रांत भेकडबाहुले छापखानेवाले असल्यामुळे ते पुस्तक छापून काढण्याचे काम तूर्त एके बाजूला ठेविले आहे. असुडाची प्रत आपल्यास पाहण्याकरिता पाहिजे त्याप्रमाणे लिहून आल्याबरोबर त्याची नकळ करण्यास लेखक बसवितो. नकल होण्यास सुमारे एकदोन महिने लागतील असा अदमास आहे. कळावे लोभ असावा हे विनंती.


------------------------------- आपला ---------
.........................................................................जोतीराव गोविंदरावफुले.
संदर्भ-------  महात्मा फुले  समग्र वांग्मय
=========================================================================
माझे मत -- बघा मित्रांनो... वरती महात्मांनी नमूद केलेल्या पोवाड्यांची तुलना आजकालच्या काळातील पुस्तकांशी करा.... त्यावेळेसचे हे पोवाडे म्हणजे आज कालची रामदास स्वामींना , दादोजी कोंडदेवांना अनायासे जास्त महत्व देणारी , ओढून ताणून गुरुपदावर जाणीवपूर्वक न्हेऊन बसवणारी ती पुस्तके म्हणजेच महात्मा फुलेंना अपेक्षित असलेली बनावट पोवाडे असे आपण समजू शकतो...
आणि हि अशी पुस्तके ज्या मध्ये --- शहाजी महाराजांना सातत्याने स्वराज्याच्या चौकटीपासून दूर ठेवणे, शिवाजी महाराजांचे कर्तुत्व इतर कोणाला म्हणजे दादोजी / रामदास अश्या बनावट / (बनवलेल्या ) गुरूंना देणे..., अथवा.. शिवरायांना देवाचा अवतार दाखवून सगळे श्रेय देवाच्या नावावर खपवणे..., शिवरायांना मुसलमान द्वेष्टा म्हणून रंगवणे..., अश्या प्रकारच्या चुकीच्या समजा पसरवल्या जातात  ; त्या पुस्तकांपासून सर्व शिव भक्तांनी सावध राहिले पाहिजे... शिवरायांचा उधो उधो करायचा.. आपण शिवरायांचे निस्सीम भक्त आहे असे दाखवायचे आणि मग हळू हळू भक्तीच्या नावावर हे असले धंदे करायचे...अश्या धूर्त लोकांपासून खऱ्या आणि निस्वार्थी शिवभक्तांनी सांभाळून राहायला हवे... कादंबऱ्या वाचून स्वतःचे इतिहासाबद्दल ठाम मत बनवू नये.. तसेच कुठल्यातरी एकाच प्रकारचे ऐतिहासिक  पुस्तक वाचून स्वतःचे इतिहासाबद्दल ठाम मत बनवू नका.. कारण एकाने चुकीचे ठाम मत बनवले आणि तेच त्याने आपल्या जवळच्या मित्र परिवाराला सांगितले तर त्या मूळे चुकीचे समज  पसरत जाऊ शकतात .. आणि त्यातूनच चुकीच्या इतिहासाच्या प्रसाराला चालना मिळत असते...

सामाजिक विचार मंथन -- भाई माधवरावजी बागल भाग ३

.............'लोकांच्या त्यावेळच्या समजुतीप्रमाणे राज्याभिशेकाशिवाय राजा न्हवे'. असे असल्यामुळे त्यांनी राज्याभिषेक करवून घेतला. तथापि, शिवाजीने यापूर्वीच रायगड जिंकल्यावर ते स्थळ राजधानी म्हणून निश्चित केले व तेथे जरूर त्या इमारती बांधण्यास सुरुवात केली होती. रायगड राजधानी करावी, हा निश्चय राज्यारोहानापुर्वीच झाला होता. परंतु हा विधी समान्त्रक यथाविधी करावा व स्थापित राज्यास धर्मराज्याचे स्वरूप द्यावे, राजासही आपल्या प्रजेच्या काल्यानाप्रित्यर्थ करावयाच्या कृत्यासंबंधी राजाने स्वतःस धर्माबंधानांनी बांधून घेऊन राज्याभिषेक व्हावा हा विचार गागाभटाचा.......
......... त्याने राजास व राजाने इतरांस सांगितला. तो सर्वात मानवला व तसा राज्याभिषेक विधी झाला. अखिल भारतीय विद्वानांत गागा भटास स्थान होते, म्हणून त्याच्या कवीस प्रांतिक किंवा स्थानिकपणा राहिला नाही.  
(श्री. रा.वी.ओतूरकर.)रामदासांचे कार्य हि कल्पनेची दौड.
येथे रामदासांचा कोठेही संबंध येत नाही. पण अनेक दुष्टात्म्यांना पाहवले नाही व पाहवत नाही. ते रामदासला शिवाजीच्या डोक्यावर नेऊन बसवतातच .
.................माझा अनुभव . १९२५ सालची गोष्ट. त्यावेळी राजाराम हायस्कूल शुक्रवार पेठेत होते. त्या हायस्कूलचा हेडमास्तर अय्यर नावाचा ब्राह्मण होता. त्याने त्रैमासिक काढले होते. त्यावर चित्रकाराकडून एक चित्र काढून घेतले होते. शिवाजी व रामदास असे. रामदास उभा आहे व शिवाजी नतमस्तक होऊन त्याला प्रणाम करीत आहेत; रामदास त्यांना आशीर्वाद देत आहे तो कसा? तर त्यांच्या डोक्यावर हात ठेऊन न्हवे , तर पायाचा पंजा मस्तकावर ठेवून !!!! बेशरमपनाची परमावधि ...!!!...............
..............गुणसागर शिवाजी :........
.............हे चित्र नजरेस येताच आमच्या 'हंटर' साप्ताहिकात भरपूर हजेरी घेतली. बेळगावच्या राष्ट्रविरचे संपादक शामराव देसाई, पुण्याच्या विजयी मराठ्याचे संपादक श्रीपादराव शिंदे यांनीही खूपच हजेरी घेतली. अखेरअय्यरला माफी मागावी लागली. चित्रपटातही असाच देखावा दाखवला गेला होता. तेव्हा अमरावतीच्या नागरिकांनी तो पडदा फाडून टाकण्यास धाव घेतली.
.............. (फुले चरित्र, धनंजय कीर - २५३)
..........भारतात नवीन युग सुरु करणारा शिवाजी हा एक महापुरुष होता. रामदास शिवाजीचा गुरु आणि मार्गदाता होता. येथपर्यंत ब्राह्मण इतिहासकारांनी इतिहासातले सत्य ताणावे हे योग्य न्हवे रामदास हा चिपळूणकर - टिळक पंथाचा गुरु होता. रामदास रामोपासक होता, तर शिवाजी शिवभक्त होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याविषयक कर्तुत्वामुळे समर्थांची सल्ला मसलत न्हवती , तर गुप्तपणे मदतही सुरु होती असे म्हणण्यापर्यंत अर्वाचीन स्वयंभू किंवा संप्रदाय दीक्षित समर्थकांनी मजल मारली अशा तऱ्हेची फारच मोठी कामगिरी समर्थांच्या झोळीत टाकण्याचे कौशल्य, आपल्या कल्पनेची बेफाम दौड मारणाऱ्या अर्वाचीन समर्थ भक्तांनी दाखवली आहे. समर्थांच्या चाफळ येथील देवस्थानाला जसे शिवाजीचे शत्रू दिनायतराव आणि बाजी घोरपद्यांचे साह्य लाभले, तसे मोरयांचेहीसाह्य मिळावे म्हणून रामदास शिवारायाकडे ये - जा करीत होते. 
.............धनंजय कीर म्हणतात , ' शिवाजी हा आदर्श नेता होता. नेता हा चारित्र्यवान, त्यागी व सदाचारी असला पाहिजे, तरच तो संघटना बांधु शकतो व केडर निर्माण करू शकतो. आजचे सर्वच नेते या आदर्शाप्रत पोचू शकतील असे नाही. आजच्या नेत्यांना हे कळले पाहिजे कि राजसत्ता हि स्वतःच्या नातेवैन्कांच्यास्वार्थसिधी साठी नसते, तर ती जनतेच्या कल्याणासाठी असते....
....................... शिवाजी महाराज म्हणजे अथांग गुणांचा सागर, त्यांच्या भूतदया आणि मानवतावादावर लिहावे, नितीशास्त्रावर लिहावे, रणनीतीवर लिहावे, व्यवहारी जीवनावर लिहावे, ध्येयवाद, व्यवहार आणि मुत्सदेगिरी यावर लिहावे. त्यांचे चरित्र म्हणजे अनेक विषयांचा वस्तुपाठ.
................ तीनशे वर्षे होऊन गेली तरी शिवानामाची जादू जिवंत आहे....... ती स्फूर्ती देत आहे.
............. ...'शिवछत्रपती शिवाजी महाराज कि जय' हि घोषणा कानावर पडताच सारा खेडूत विजेचा धक्का बसल्याप्रमाणे जागा होतो. झोपी गेलेले वाघ डरकाळ्या देत बाहेर पडतात. शाहिरांचा हात नकळत डफावर पडतो. हलग्या वाजू लागतात. रणशिंग फुंकले जाते. पोरे नाचू लागतात. म्हातारे तरुण होतात. मिरवणुकीत भाग घेण्याकरिता स्त्रिया धांदल करतात..
........ उस्फूर्त गाणे अंतकरणातून बाहेर पडते.....
..................... शिवबा ये रे ये |
..................... राष्ट्ररणी व्हावयास सेनानी
..................... शिवबा ये रे ये ||
==================== (सामाजिक विचार मंथन)
----भाई माधवराव बगल
 


सामाजिक विचार मंथन -- भाई माधवरावजी बागल भाग २

रणजीत देसाईंची खुशामत...
........................या गटात मराठी कादंबरीकार रणजीत देसाई सामील झाला व त्याने इतिहासाची पाने ब्राह्मणांना खुश करण्याकरिता सत्याची फिरवाफिरव करून लिहिली. मराठा समाजाला अभिमान वाटेल अशी त्यांची लेखणी आहे. भाषा सोपी आहे.रचनाकौशल्य आहे. एखादी स्त्री रूपवान आहे, पण तिने ते सौंदर्य धनप्राप्ती साठी विकले असल्यास लोक तिचा तिटकाराच करतील.
......... रणजीत देसाई याने रामदासला राज्याभिषेकाला अगोदर आपल्या कादंबरीत आणला. ती कादंबरी असली तरी त्या साधनाने इतिहासाचा विपर्यास करणे हा गुन्हा आहे. पण त्याला ब्राह्मण पुढाऱ्यांकडून व त्यांच्या वर्तमानपत्राकडून गौरव करून घायचा होता तसा त्यांनी गौरव केला. रामदासाचा आशीर्वाद घेऊन तेसिंहासनारूढ झाले!!
.......................समर्थांची भेट घेऊन राजे रायगडी येत होते. महाराज म्हणतात, मोरोपंत, हत्तीवर अंबरी बरी चढवली?" राज्याभिषेकानंतर देवदर्शनाला अंबारीतून जावे लागले. त्यासाठी हत्ती सजवले. (याचा अर्थ राज्याभिषेकापुर्वी रामदासांची गाठ पडली होती असे रणजीत वर्णन करतात.) त्या कादंबरीचे पान २१५ - जिजाबाई रामदासला म्हणतात,'महाराज, आपण आलात, दर्शन घडला. महाराज काळजी वाटते शिवबाची. आम्ही निघतो. आत्ता त्याला मायेचे कोणी राहिले नाही, ती जवाबदारी आपली. आम्ही आत्ता त्याला तुमच्या ओट्यात टाकतो, त्यालासांभाळा.'
शिवबा हेच मूळी प्रजेचे पालनकर्ते होते. त्याला रामदासाच्या ओट्यात टाकण्या इतकी रामदासाची पात्रता न्हवती. हा सर्व शिवभक्तांचा व शिवाजीचा रणजीतने अपमान करून अक्षम्य गुन्हा केला आहे.
.....................'शिवाजी दि प्रगमन्तिस्त(pragmantist ) ' (के.अल.महालये, एम.ए.विदर्भ महाविद्यालय - इतिहास विभाग) लिहितात. 'शिवाजी महाराजांच्या जीवनावर कथा - कादंबऱ्या लिहून अगर चित्रपट काढून शिवभक्ती दाखवणे हे हास्यास्पद व मूर्खपणाचे होय.'
रियासतकार सरदेसाई यांनी दिलेली माहिती,- 'रामदासाची व महाराजांची राज्यारोहानापुर्वी गाठही पडली न्हवती व ओळखही न्हवती, हे पुराव्यानिशी सिद्ध होते - १६५९ नोव्हेंबरला अफजलखानाचा वाढ झाला.
.........त्यांची प्रेरणा स्वयंभू होती..............
.........अफजलखानाच्या वधापुर्वीचे म्हणजे १८ फेब्रुवारी १६५९ चे भास्कर गोसाव्याचे. दिवाकर गोसाव्यास आलेले पत्र उपलब्ध आहे. ते पुढीलप्रमाणे - मी शिवाजी राजेस भेटीस गेलो होतो. त्यांनी विचारले. 'तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी असता?' आम्ही रामदासी श्री समर्थांचे शिष्य - चाफलास राहतो' .....ते कोठे राहतात?' .......याचा सरळ अर्थ या वेळेपर्यंत शिवाजींना रामदास हे कोण माहित न्हवते.,..............
...................... पुढे केव्हा तरी रामदास महाराजांची भेट घ्यायला आले असतांना रामदास शिवाजींना खालील वाक्ये टोचून बोलले, 'तुमचे देशी वास्तव्य केले पण वर्तमान नाही घेतले' हे स्वतः रामदासाच म्हणतात. असे असतांनाराज्यारोहानाआधी रामदासाची गाठ कादंबरीत लिहून त्यात घालणे किती कृतघ्नपणा!!..........
.........गोविंद चिमणाजी भाटे म्हणतात, '- शिवाजी महाराजांनी रामदासाची गाठ पडण्यापूर्वीच स्वराज्याची स्थापना केली होती. तोपर्यंत शिवाजी महाराजांनी ज्या संघटना बांधल्या, छापे घातले, लढाया केल्या, किल्ले हस्तगत केले. जगाला थक्क करणारी रणनीती व राजकीय मुत्सदेगिरी दाखविली, तिचा व रामदासांचा काडीचाही संबंध न्हवता.'..........

.............प्रा. न.रा. फाटक म्हणतात,'शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा कोणाकडूनही घेतली न्हवती,. परिस्थितीनेच त्यांना प्रेरणा दिली..
............डॉ . आंबेडकर चरित्र, कीर, पान १४४ - ' रामदासाची सामाजिक भूमिका माणसाची मूल्य ओळखणारी नसून ती ब्राह्मणांची वर्ण वर्चस्वाची नि ब्राह्मण जातीची महती गाणारी होती. रामदासी पंथांचे लोक तर पहिल्यापासूनच जातीदुराभिमानी व कडवे म्हणून प्रसिद्ध आहेत'........
.............. आचार्य भागवत म्हणतात,'- शिवाजीच्या कर्तुत्वाचा उगम रामदासांकडे आहे, असे म्हणणे निराधार आहे. शिवाजीचे कर्तुत्व पाहूनच रामदासला राजकीय विचार सुचले, ऐरवीसुचले नसते-'............
.............. डॉ . पवार, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ म्हणतात,'-शिवाजी महाराजांना रामदासांची शिकवण होती, हि गोष्ट संपूर्ण निराधार आहे. ज्यांना शिवाजी महाराजांचे मोठेपण खपत नाही व ज्या वर्गाने त्यांच्या हयातीत त्यांना त्रास दिला , तोच वर्ग अद्याप हा उपहासाच करीत आहे. रामदासांची शिकवण शिवाजीने घेतली असती तर महाराष्ट्राने ऐक्य त्यांना केव्हाच साधता आले नसते-'.....
........रामदास हे शत्रूंचे हेर होते:
...इतकेच न्हवे तर हिंदुतील ब्राह्मणेतर अस्पृश्यांची एकी घडवून आणता आली नसती. आणि महाराष्ट्राला गुलामगिरीतून मुक्त करता आले नसते.
......वीर उत्तमराव मोहिते म्हणतात, ' रामदास हे शिवाजीचे गुरु तर मुळीच न्हवते, ते आदिलशहा व औरंगजेबाचे हेर होते. नेताजी पालकर मोगलांच्या छावणीतून गुप्तपणे निसटला आणि साताऱ्यास शिवाजीस भेटला. शिवाजीने त्याला आपल्या अधिकारात हिंदू करून घेतले,क्रांतिकारकच कृत्य होय-'  

सामाजिक विचार मंथन -- भाई माधवरावजी बागल भाग १

७)- सामाजिक विचार मंथन -- भाई माधवरावजी बागल
ब्राह्मणी श्रेष्ठत्वाचा रामदासी प्रयत्न : - महाराजांना दादोजी कोंडदेवाने युद्धशास्त्र शिकवले नाही, रामदासाने तर नाहीच नाही. त्यांच्या अंगी ती पात्रता न्हवती. आणि राज्यारोहानापर्यंत रामदासाची व शिवछत्रपतींची गाठही पडली न्हवती.--------------
शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नाला हिंदूंचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे (प्रा. नरहरी कुरुंदकर)
-------------
किंकेड म्हणतो
- शिवाजी हा अलौकिक असा दूरदृष्टी , सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी व राजकारण धुरंधर होता. राष्ट्रीय स्वातंत्र्य हे त्याचे एकमेव ध्येय होते.
---------------
केशव राव ठाकरे म्हणतात - शिवाजीला गोब्राह्मण प्रतिपालक ठरविण्याचा बूट ब्राह्मणांनी रचला. शिवाजीच्या पत्रव्यवहारात गाई आणि ब्राह्मण यांना स्थान न्हवते.
---------------
अर्जुनराव केळकर म्हणतात, ' स्वतःस राज्याभिषेक करून घेण्याचा निर्धार केल्यानंतर मगच मातुश्रींची संमती घेतली. नंतर महाराष्ट्रातील संतांना भेटले. रामदास हे त्यापकी एक होते. बापाची सल्लामसलत घेण्याचा प्रसंग त्यांना कधीच आला नाही. उलट बापाने विरोध केला असता त्यांनी तो मुळीच मानला नाही.
रामदास हा तर महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत केव्हाच भेटला न्हवता व त्यांची व महाराजांची गाठही पडली न्हवती. शिवाजी महाराजांचे मार्गदर्शन करण्याची त्यांचा अंगी पात्रता न्हवती. त्यांच्या मार्गदर्शनाने समाजाची संघटनच करता आली नाही.
                ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व राखण्याचा अतिहीन प्रयत्न रामदासाने केला. ब्राह्मनाखेरीज इतर हिंदूंना रामदासाने अगदी हिनच लेखले.डोके वर काढणाऱ्यांना लाथा मारायच्या व त्याचे पुढारीपण प्रस्थापित झाले कि, त्याच्या पायावर डोके ठेवायचे !..........................
                त्यावेळी नांगरणीला ट्र्याकटर्स (tractors ) न्हवते, नांगरणीसाठी शेतकऱ्यांना बैलाची अत्यंत जरुरी होती. बैलांची पैदास गाई शिवाय होणे शक्य नाही. यादृष्टीने शिवाजी महाराज गोपालन, राष्ट्राला आवश्यक म्हणून पाहत. गोपालन झाले नसते, तर शेतकऱ्याला व त्यांच्या कुटुंबियांना जगणेच अशक्य झाले असते................
............... पण ब्राह्मण वर्ग गोपालानाकडे स्वार्थी दृष्टीने पाहत होता. शेतावर जाऊन नांगरणी - कुळवणी करणारा हा वर्ग न्हवे. स्वतःच्या जमिनी ब्राह्मणेतरांना लावून कष्टाशिवाय जगणारा हा वर्ग, गोपालानामुळे दुधदुभात्याची यांची चंगळ! गोपालानाबरोबर ब्राह्मंपालन होऊ शकत होते. म्हणून त्यांनीमहाराजांना 'गोब्राह्मण प्रतिपालक' हा किताब देऊन टाकला.
महाराजांच्या व ब्राह्मणांच्या दृष्टीतला हा फरक होता. महाराजांची दृष्टी राष्ट्रीय होती, ब्राह्मणी जातीय होती. ती रामदासांच्या खालील श्लोकातून अगदी स्पष्टपणे दिसून येते -

..............गुरु तो सकलाशी ब्राह्मण | जरी तो झाला क्रियाहीन ||
..............तरी तयासीच शरण | अनन्य भावे असावे||
..............ब्राह्मण वेद मूर्तिमंत| ब्राह्मण तोची भगवंत||
..............पूर्ण होती मनोरथ| विप्र वाक्ये करुनी||
.............असो ब्राह्मणा सुरवर वंदिती | तेथे मानव बापुडे किती||
.............जरी ब्राह्मण मूढमती| तरी तो जगत्वान्द्या ||
.............अंत्यजे शब्द्ज्ञाता बरवा| परी तो घेऊन करावा||
.............ब्राह्मण संनिध पुजावा| हे तो न धडे कधी||

.......................... हे वाचल्यावर या गृहस्थाला कोणीही संत अगर साधू म्हणणार नाही. काय शिकवले रामदासाने?? अश्या प्रकारचे विचार, अज्ञ ब्राह्मनेतारांच्या डोक्यात ठासून घातल्यामुळे यांनी विनाश्रम दुध मिळण्याची सोय करून घेतली व शिवाजी महाराजांना ' गोब्राह्मण प्रतिपालक' हे चिटकवून टाकले. पण कोणत्याही बखरीत महाराजांना हे विशेषण स्वतःला लावून घेतलेले नाही.
'गोब्राह्मण रक्षक' म्हणवीत नसत
याच भटांनी राज्यारोहण होण्यापूर्वी महाराजांना क्षुद्र म्हणून राज्यारोहानाला मान्यता दिली न्हवती.चढणाऱ्यास खाली ओढायचे.चढलेल्यांचे पायावर डोके ठेवायचे , हि त्यांची नीती. 
.............इतिहास संशोधक शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. पवार मुंबई युनिव्हर्सिटीत केलेल्या भाषणात म्हणतात,'पूर्वीच्या बखरीत अगर ऐतिहासिक कागदपत्रात महाराजांना मी 'ब्राह्मण प्रतिपालक' असे विशेषण लावलेले अगर त्यांनी लावून घेतलेले कोठेच आढळत नाही. उलट राजा जयसिन्हाला लिहिलेल्या पत्रात शिवाजीने घोड्याची शपथ घेऊन विश्वास पटवण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्ह्याच्या बाबतीत ब्राह्मणाचे पालन करण्याची हमी शिवाजीने दिली न्हवती. अशा खास सवलती पेशव्यांनी दिल्या होत्या. असा पक्षपात शिवाजीने आपल्या राज्यातप्रजाजनान्बद्दल केला न्हवता.
................. त्यांच्यात धर्माभिमान न्हवता असे म्हणणार नाही. पण तो धर्माभिमान मुसलमानांचा द्वेष करीत न्हवता. देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याकरता होता, पण याचा विचार ब्राहामनांनी केला नाही व त्यांच्या राज्यारोहानाला ते क्षुद्र मानून त्यांनी विरोध केला. पण गागा भटकडून मंत्रशुध राज्याभिषेक घेतल्यानंतर यांना ' गोब्राह्मण प्रतिपालक' म्हणण्यास सुरुवात केली व राज्यारोहण झाल्यानंतररामदासाला गुरुपद दिले.

रामदासांची शिकवण आणि महाराजांची वर्तणूक...

६) रामदास महाराजांचे अध्यात्मिक दृष्ट्याही गुरु न्हवते. कारण रामदासांचे विचार हे ब्राह्मणी वर्चस्व भावनेतून ब्राह्मण धर्म  रक्षण करणारे होते. उदा. दाखल त्यांचे काही श्लोक घेता येतील  
अंतर तो एक खरे, परी संगती घेऊ नये महारे|
 पंडित आणि चाटी पोरे | एक कैशी ||
 
(वरील श्लोक विरोधी शिवरायांची भूमिका ---- वाई परगण्यातील नागनवाडी गावाची पाटीलकी छ. शिवरायांनी नागनाक महाराला दिली. अनेक महार , मांग किल्लेदार होते. तर रामोशी हेर खात्यात होते...)  
गुरु तो सकालांशी ब्राह्मण | जरी तो झाला क्रियाहीन,
तरी तयासीच शरण | अनन्यभाव असावे ||
 
(वरील श्लोक विरोधी शिवरायांची भूमिका -- संत तुकाराम महाराज, याकूत बाबा अशा ब्राह्मणेतर संतांना हि शिवराय मानत...) 
असो ब्राह्मण, सुरवर वंदिती| तेथे मानव बापुडे किती|
जरी ब्राह्मण मूढमती | तरी तो जगदवंद्य ||
 
अर्थ -- मूढमती म्हणजे मूर्ख. ब्रह्मण मूर्ख असला तरी तो जगाला वंदनीय असतो, असे रामदास म्हणतात. 
देवा ब्राह्मणा राज्य करी | तो एक मूर्ख || 
रामदासांनी सांगितलेले मूर्खाचे एक लक्षण.
महाराजांचे विरोधी तत्व --- छ. शिवरायांनी ब्राह्मणांवर फक्त राज्यच केले नाही तर वेळ पडल्यास त्यांना कठोर शासनही केले. अशा छ. शिवरायांना रामदासांचे शिष्य मानाने योग्य वाटत नाही...कारण दोघांच्या विचारात बराच विरोधाभास आढळतो.... 
संदर्भ ---- शिवचरित्र मिथक आणि वास्तव. - ---श्यामसुंदर मिरजकर.

शिवरायांचे रामदास गुरु न्हवते...

५) रामदास हे छ. शिवरायांचे अध्यात्मिक किंवा राजकीय गुरु न्हवते याचे आणखी काही पुरावे देता येतील.
                                          
              एका पत्रावरून छ. शिवरायांच्या मनात रामादासंविषयी कोणती भावना होती, छ. शिवरायांचे काय स्थान होते. ते स्पष्ट होते. दि. ९/८/१६७६ रोजी छ. शिवरायांनी दत्ताजीपंत व गणेश गोजदाऊ यांना लिहिलेल्या आज्ञापत्रात म्हटले आहे. ' रामदास गोसावी व देवाकरिता ब्राह्मण तेथे येऊन राहतात , त्यांचा परामर्ष घ्यावा' -- (शिवरायांची आज्ञापत्रे.) या आज्ञापत्रावरून काही गोष्टी स्पष्ट होतात. छ. शिवराय रामदासांचा उल्लेख आदरपूर्वक करीत नाहीत. जर गुरु असते तर आज्ञेत 'श्री रामदास स्वामी' असे म्हटले असते. इतर सामान्य साधू, गोसाव्याप्रमाणे रामदासांना दान- दक्षिणा द्यावी असा छ. शिवरायांचा सूर आहे. रामदास गुरु असते तर छ. शिवरायांनी त्यांना अशी वागणूक देण्याविषयी फर्मावले असते काय???? पुढे १६७८ मध्ये छ. शिवरायांनी चाफळच्या मठास इनाम दिल्याचा पुरावा आहे. पण याचा अर्थ छ. शिवरायांचे रामदास गुरु होते असा होत नाही. छ. शिवरायांनी अनेक साधू संतांना जमिनी इनाम दिल्या. मग ते सर्वच छ.शिवरायांचे गुरु होतात काय??


               रामदास हे छ. शिवरायांचे गुरु होते असे क्षणभर मान्य केले , तरी काही प्रश्न उद्भवतात. त्यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा छ. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा महाराष्ट्रातील तमाम ब्राह्मणांनी विरोध केला, तेव्हा ब्राह्मण असणाऱ्या रामदासांनी छ. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी कोणतेच प्रयत्न का केले नाहीत?? समजा प्रयत्न करायचे बाजूस ठेवले तरी ६ जून, १६७४ रोजी जेव्हा राज्याभिषेक झाला, तेव्हा राज्याभिषेकास काशीहून (उत्तर भारत) गागाभट्ट आला. तर परदेशातून हेन्री औक्जिडेन्त उपस्थित राहिला. मग महाराष्ट्रात भटकणाऱ्या रामदासांना आपल्या महान शिष्याला आशीर्वाद देण्यासाठी राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहावे असे का वाटले नाही? यातून हेच स्पष्ट होते कि रामदास हे छ. शिवरायाचे गुरु न्हवते. रामदास राजकीय दृष्टीकोनातून छ. शिवरायांचे गुरु न्हवतेच, कारण राज्याभिषेकापर्यंत छ. शिवरायांची रामदासांशी भेट झाल्याचा कोणताच पुरावा नाही.

रामदासांना गुरु बनवण्याचा राजवाड्यांचा प्रयत्न हाणून पाडला..

४) रामदासांनी लिहिलेल्या कोणत्याही ग्रंथात 'मी शिवरायांचा गुरु आहे ' किंवा ' शिवराय माझे शिष्य आहेत' असे प्रत्यक्षपणे देखील म्हटलेले नाही. छ. शिवरायांच्या समकालीन बखरीत किंवा ग्रंथात छ. शिवराय व रामदास यांच्या गुरु- शिष्यत्वाचा उल्लेख नाही. इतकेच काय छ. शिवराय व रामदासांच्या भेटीचाही उल्लेख नाही. सभासदांची बखर , ९१ कलमी बखर, स्वानुभव दिनकर, शिवभारत, जेधे शकावली अशा १७ व्या शतकातील समकालीन अनेक ग्रंथात वरील प्रकारचा उल्लेख नाही. परंतु छ. शिवराय व रामदासांचा संबंध १८ व्या शतकाच्या शेवटी (१७९०) हनुमान स्वामीच्या बखरीत चीटनिसांनी प्रथम केला. मग रामादासभक्तानी अशा अनेक कथा रचून छ. शिवरायांचे गुरु रामदास म्हणून सांगण्यास सुरवात केली. या पार्श्वभूमीवर म. फुलेंनी प्रथम खऱ्या इतिहासाची मांडणी केली. नंतर कृ.अ.केलुस्कारांनी शास्त्रीय चिकित्सा करून छ. शिवरायांचे ऐतिहासिक चरित्र लिहिले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत १९०२ साली इतिहासाचार्य म्हटल्या जाणाऱ्या वी. का. राजवाड्यांनी खोट्या पुराव्यांच्या आधारे 'राष्ट्रगुरू रामदास ' हा लेख 'ग्रंथ माला' मासिकात लिहिला. मग या विचारला मोठीच चालना मिळाली.  
                             राजवाड्यांनी पुढे केलेले सर्व पुरावे निराधार आहेत, असे पुढे संत साहित्याचे अभ्यासक म.व.धोंडांनी सिद्ध केले. जुलै १९२९ च्या विविधज्ञानविस्तार या अंकात न.रा.फाटकांनी ' रामदास आणि शिवाजी' हा दीर्घ लेख लिहून वी.का.राजवाड्यांना चोख उत्तर दिले. पुढे शेजवलकर, व.सी.बेंद्रे., अप्पासाहेब पवार आदी अनेक इतिहास अभ्यासकांनी रामदासांना छ. शिवरायांचे गुरु ठरवण्याचे कारस्थान मोडून काढले.  
                 'रामदासांचे लेखन व शिवरायांचे कार्य यांचे कोणतेच नाते नाही. मग गुरु-शिष्याचा संबंध कसा जोडायचा ?' असा प्रश्न म.व. धोंडांनी उपस्थित केला आहे.

विश्वसनीय साधन सामुग्री

३) शिवाजीच्या चरित्रविषयक साधनात रामदासी पंथांच्या बखरी या सर्वात जास्त अविश्वसनीय आहेत. मेरुस्वामी व दिनकर हे दोनच शिष्य असे आहेत कि , जे समर्थ वारले, त्या वेळी वयाने प्रौढ होते. इतर सर्वांचे ज्ञान ऐकीव व विपर्यस्त आहे. -- नरहर कुरुंदकर... 
                      रामदासाची सर्वात जुनी चरित्रे मेरुस्वामी, दिनकर स्वामींची . त्यात शिवाजीचा उल्लेख नाही. शिवाजीचे सर्वात जुने चरित्र सभासदाचे. तिथेही रामदासाचा उल्लेख नाही. ज्यांनी रामदास चरित्र जवळून पहिले व रामदास- निधना समयी जे प्रौढ होते, व ज्यांनी शिवाजी जवळून पहिला, त्यांनी रामदास उल्लेखलेला नाही.
" जिजाबाईंच्या निधनसमयी रामदास तिथे होते, हि माहिती बखरीची आहे, आणि उत्तरकालीन बखरीची आहे. शिवाजीला समर्थांचा मंत्रोपदेश नाही. " -- नरहर कुरुंदकर...
संदर्भ -- श्रीमान योगी कादंबरीच्या निमित्ताने रणजीत देसाई यांना लिहिलेले नरहर कुरुंदकर यांचे पत्र जे प्रस्तावने खातीर त्या पुस्तकाच्या सुरवातीस  छापलेले आहे

अनुग्रह?????

२) दासबोध मी वाचलेला आहे. एम .ए. ला शिकवलेला हि आहे . त्यात राजकारण फारसे नाही. सगळा भक्तीमार्गच आहे. फक्त राजकारण हा शब्द आहे. त्या नावाचे समास आहेत. पण त्यातही राजकारण नाही. रामदासी पंथ आदिलशाहीच्यात स्थापिला गेला व चाफळ देवस्थानाचे पहिले विश्वस्थ शिवाजीचे शत्रू आहेत. याचा अर्थ १६४९ ला रामादासासमोर शिवाजी न्हवता, असा आहे.आणि ते स्वाभाविक आहे. कारण हा वेळपावतो शिवाजीचा फारसा उपक्रम कुणाला दिसलेलाच न्हवता. पण एकानाथांप्रमाणे रामादासही हिंदूंच्या पुनर्जीवनाची स्वप्ने पाहत होता. हिंदुधर्माचा अभिमान म्हणून मुसलमानांचा राग त्यांचा मनात होताच. औरंगजेब -- शिवाजी व रामदास -- दोघेही मेल्यावर २७ वर्षे जिवंत होता. पण औरंग्या पापी बुडाल्याची स्वप्ने एकानाथानुसरण करीत रामदास आधीच पाहत होता.
समोरचा पुरावा पाहून अनुमान करायचे, तर रामदासाचे शिवाजीकडे उत्कटतेने लक्ष १६५९ नंतर गेले असावे .'तुमचे देशी वास्तव केले. परंतु वर्तमान नाही घेतले' असा रामदासाचा दावा या अनुमानाला पोषक आहे.
                           शिवाजीला साधुसंतांविषयी आदर व आत्मीयता होती. साधुसंत तृप्त करणे, धर्म बिनधोक करणे तो स्वतःचे कर्तव्याच समजत होता. हिंदू राज्य जन्मते आहे, हे पाहून रामदास स्वाभाविकच हर्शोत्फुल झाला असावा. 'शिवाजीचा विजय, हा माझा विजय' व शिवाजीवर संकट, हे माझे संकट' असे रामदासला वाटले आश्चर्य नाही. (शिवाजी महाराज रयतेचे राजे होते त्या मूळे रयतेला शिवाजी महाराजांबद्दल अश्या प्रकारची आपुलकी असणे साहजिक वाटते..--- माझे मत) शिवाजीचे काही हेर रामदासी म्हणून हिंडत असणे अगर रामदासी मंडळींनी काही समजले, तर लगेच कळविणे असेही घडत असावे.(रयतेला शिवाजी महाराजांबद्दल आपुलकी होती..त्या मूळे त्यांच्या पर्यंत पोहचणारी बातमी ते आपल्या राजापर्यंत पोहोचावी ज्याने करून त्याला आपल्या कडून थोडी मदत व्हावी हि इच्छा असणे साहजिक वाटते...तसेच रामदासी मठ सर्वप्रथम आदिलशाहीत स्थापन झाला...त्या मूळे आदिलशाहीशी रामदासांचे चांगले संबंध असल्यासारखे वाटते...अथवा आदिलशाही चे रामदासंबद्दल चांगले मत असावे म्हणून त्यांना आदिलशाहीत मज्जाव नसावा..त्याचाच फायदा शिवाजी महाराजांच्या हेरखात्याने आदिलशाहीत हेरगिरी कार्यासाठी घेतला असावा...अथवा रामदास हे हिंदू प्रेमी होते त्यामुळे त्यांनी स्वतः आपल्या भक्तांद्वारे आदिलशाहीतील गोपनीय माहिती शिवाजी महाराजांच्या हेरखात्या कडे पोहचवण्याची तरतूद केलेली असावी असे वाटते...----- माझे मत) पण हा इतिहास १६६० नंतरचा. प्रत्यक्ष राजकारणाशी रामदासांचा संबंध न्हवे . ------------------- नरहर कुरुंदकर.... 

स्वराज्याची सुरवात

१) रामदास हे लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेले...हे सगळ्यांना  माहीतच असेल...
जन्म - १६०८ ... १२ वर्षाचे म्हणजे १६२० ला ते लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेले...असो त्यानंतर म्हणे त्यांनी १२ वर्षे नाशिकला राम भक्तीत घालवली....आणि त्या नंतर १२ वर्षे भारत भ्रमंतीला गेले....
(१२ -१२ -१२ वर्षांचा similarity हा बहुतेक योगायोगच असावा..रामदासांनी बऱ्याच गोष्टी १२ -१२ -१२ वर्षांनी केलेल्या दिसतात..) असो म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी ते भारत भ्रमंतीला गेले.. १६३४ .... नंतर १२ वर्षांनी परत आले १६४६-१६४७ ला ......
      शिवाजी महाराजांनी स्वराज्य साठी १६४५ ला त्यांनी दादोजी नरसप्रभू देशपांडे यास एक पत्र लिहिले. तसेच १६४६ ला न्यायनिवाडाविषयक एका पत्रात शिरोभागी शिवाजी महाराजांची मुद्रा आढळते...
तसेच शिवरायांनी १६४७ मध्ये तोरणा आणि राजगड हे दोन किल्ले घेतले....१६४७ च्या दिवाळीत पुरंदर किल्लाही मोठ्या कौशल्याने आपल्या वर्चस्वाखाली आणला...
स्वराज्य प्राप्तीची जमवाजमव १६४५ साली सुरु करण्यात आली....त्या मूळे इथे रामदासांचा काडीचा संबंध नाही हे सिद्ध होते...
                                 कारण रामदास हे १६४६ ला परिसरात आले.....असो.. ते जेव्हा आले त्या नंतर त्यांचे खरे काम चालू झाले त्या मूळे त्या आधी ते प्रसिद्ध असणे हे पटण्यासारखे नाही....काही जणांच्या मते रामदास १६४४ ला चाफळ इथे आले व त्यांनी तिथे कामास सुरवात केली.....त्यांनी प्रथम रामाची मूर्ती स्थापन करून रामजन्मोत्सव चालू केला..अश्या पद्धतीने त्यांनी कार्यास सुरवात केली....पुढे त्यांनी रामाला अनुसरून हनुमान भक्ती प्रचलित आणायला चालू केली.....रामदास पंथाची स्थापना १६४९ ला झाली....
                             काही जन १६४९ ला रामदासांचा अनुग्रह महाराजांनी घेतला असे खोटे दावे करतात......रामदास शिवाजी महाराजांच्या शत्रूच्या आश्रयी ( बाजी घोरपडे यांचे कडे) असतांना शिवाजी महाराज रामदासांचा अनुग्रह घेतात हे पटण्यासारखेच नाही....बाजी घोरपडेंनी व आदिलशाहने रामदासांच्या चाफळ देवस्थानाला काही जमिनी इनाम दिल्या. त्यामुळे बाजी घोरपडे आणि मुरार जगदेव हे आदिलशहाचे सरदार चाफळ देवस्थानाचे विश्वस्त होते.