Thursday, August 19, 2010

अनुग्रह?????

२) दासबोध मी वाचलेला आहे. एम .ए. ला शिकवलेला हि आहे . त्यात राजकारण फारसे नाही. सगळा भक्तीमार्गच आहे. फक्त राजकारण हा शब्द आहे. त्या नावाचे समास आहेत. पण त्यातही राजकारण नाही. रामदासी पंथ आदिलशाहीच्यात स्थापिला गेला व चाफळ देवस्थानाचे पहिले विश्वस्थ शिवाजीचे शत्रू आहेत. याचा अर्थ १६४९ ला रामादासासमोर शिवाजी न्हवता, असा आहे.आणि ते स्वाभाविक आहे. कारण हा वेळपावतो शिवाजीचा फारसा उपक्रम कुणाला दिसलेलाच न्हवता. पण एकानाथांप्रमाणे रामादासही हिंदूंच्या पुनर्जीवनाची स्वप्ने पाहत होता. हिंदुधर्माचा अभिमान म्हणून मुसलमानांचा राग त्यांचा मनात होताच. औरंगजेब -- शिवाजी व रामदास -- दोघेही मेल्यावर २७ वर्षे जिवंत होता. पण औरंग्या पापी बुडाल्याची स्वप्ने एकानाथानुसरण करीत रामदास आधीच पाहत होता.
समोरचा पुरावा पाहून अनुमान करायचे, तर रामदासाचे शिवाजीकडे उत्कटतेने लक्ष १६५९ नंतर गेले असावे .'तुमचे देशी वास्तव केले. परंतु वर्तमान नाही घेतले' असा रामदासाचा दावा या अनुमानाला पोषक आहे.
                           शिवाजीला साधुसंतांविषयी आदर व आत्मीयता होती. साधुसंत तृप्त करणे, धर्म बिनधोक करणे तो स्वतःचे कर्तव्याच समजत होता. हिंदू राज्य जन्मते आहे, हे पाहून रामदास स्वाभाविकच हर्शोत्फुल झाला असावा. 'शिवाजीचा विजय, हा माझा विजय' व शिवाजीवर संकट, हे माझे संकट' असे रामदासला वाटले आश्चर्य नाही. (शिवाजी महाराज रयतेचे राजे होते त्या मूळे रयतेला शिवाजी महाराजांबद्दल अश्या प्रकारची आपुलकी असणे साहजिक वाटते..--- माझे मत) शिवाजीचे काही हेर रामदासी म्हणून हिंडत असणे अगर रामदासी मंडळींनी काही समजले, तर लगेच कळविणे असेही घडत असावे.(रयतेला शिवाजी महाराजांबद्दल आपुलकी होती..त्या मूळे त्यांच्या पर्यंत पोहचणारी बातमी ते आपल्या राजापर्यंत पोहोचावी ज्याने करून त्याला आपल्या कडून थोडी मदत व्हावी हि इच्छा असणे साहजिक वाटते...तसेच रामदासी मठ सर्वप्रथम आदिलशाहीत स्थापन झाला...त्या मूळे आदिलशाहीशी रामदासांचे चांगले संबंध असल्यासारखे वाटते...अथवा आदिलशाही चे रामदासंबद्दल चांगले मत असावे म्हणून त्यांना आदिलशाहीत मज्जाव नसावा..त्याचाच फायदा शिवाजी महाराजांच्या हेरखात्याने आदिलशाहीत हेरगिरी कार्यासाठी घेतला असावा...अथवा रामदास हे हिंदू प्रेमी होते त्यामुळे त्यांनी स्वतः आपल्या भक्तांद्वारे आदिलशाहीतील गोपनीय माहिती शिवाजी महाराजांच्या हेरखात्या कडे पोहचवण्याची तरतूद केलेली असावी असे वाटते...----- माझे मत) पण हा इतिहास १६६० नंतरचा. प्रत्यक्ष राजकारणाशी रामदासांचा संबंध न्हवे . ------------------- नरहर कुरुंदकर.... 

No comments: