Saturday, January 22, 2011

16) १६५८ पर्यंत शिवरायांना रामदास स्वामीच माहित न्हवते..

=========================================================================
भाटेकृत सज्जन गड
पृ. १०९ श.                   (१०४० = ८६३ अ);       श. १५८० फाल्गु.शु. २  ;     इ.१६५८ फेब्रु. १३ 

भास्कर गोसावी  हे दिवाकर गोसावी ह्यांना पत्र लिहितात..
ते पुढील प्रमाणे--
"..चे  उछाहा  होनु पनास भिक्षेस मिळाले ते मानाजी गोसावी बराबर पाठीवले , पावतील. शिवाजी राजे यांचेकडे भिक्षेस गेलो त्यांनी + + + रीले तुम्ही कोठील कोण कोणा ठिकाणी असता . त्यावरून आम्ही बोललो कि , आम्ही रामदासी, श्री समर्थांचे शिष्य चाफळास हो. मग ते बोलले कि ते कोठे राहतात व मूळ गाव कोण . त्याजवरून मी सांगितले की, गंगातीरीचे जांबचे राहणी. प्रस्तुत चाफळास मठ करून श्रीदेवाची स्थापना करून उत्साव महोस्तव चालू करून आम्हा सर्वास आज्ञा की , तुम्ही भिक्षा करून उत्साह करत जावा . सांगितल्यावरून आम्ही हिंडत आहो. असे बोलता राजेश्रींनी दत्ताजीपंत वाकेनिवीस यास प्रतिवर्षी श्रीउत्साहास दोनशे होनु देत जाणे म्हणून पत्र पाठविले ते हो ++स येतील हे विनंती."
==========================================================================
 संदर्भशिवकालीन पत्रसार संग्रह , vol.1, letter no. 1040; page no -277.

भास्कर गोसावी दिनकर गोसाव्यास पत्र लिहितात..
 भास्कर गोसावी आणि  दिनकर गोसावी हे दोघेही  रामदासी शिष्यच...त्यातही दिनकर गोसावी हे पट्ट शिष्य.. भास्कर स्वामी ने  दिनकर स्वामीस.. आपल्या भटकंतीचा म्हणा/ मोहिमेचा म्हणा.. अहवाल देण्यासाठी वरील पत्र लिहिलेले दिसून येते...कारण रामदास स्वामींच्याच सांगण्यावरून भास्कर गोसावी भिक्षा मिळवण्याच्या हेतूने भटकंतीस निघाला होता.. ह्या भटकंती दरम्यान शिवरायांसारख्या राज्याने  दिलेल्या  भिक्षुकेचा अहवाल आपल्या शिष्यगणातील प्रमुखास कळवणे हे  साहजिक आहे.. ज्याने करून हि बातमी रामदास स्वामींपर्यंत पोहोचावी..    
हे पत्र १६ फेब्रुवारी साल १६५८ चे आहे..मराठी तारखेनुसार - फाल्गुन. शु.२ शके १५८०...
त्या पत्रावरून निघणारा निष्कर्ष-

१) शिवरायांच्या दरबारी भास्कर गोसावी भिक्षा मागत पोहचले...भिक्षा मागत फिरण्यास त्यांना खुद्द रामदास स्वामींनी सांगितलेले..
२) शिवरायांनी भास्कर स्वामी आणि त्याच्या सोबत जे कोणी असतील त्यांना तुम्ही कोण व कुठून आला असे विचारले असता.. भास्कर स्वामींनी आम्ही रामदासांचे शिष्य असे उत्तर दिले.. तेव्हा शिवरायांनी भास्कर स्वामीस विचारले कि हे रामदास स्वामी कोठे राहतात.. मूळचे गाव कोणते...त्यावर.. भास्कर गोसाव्याने उत्तर दिले.. कि ते मूळ जांभ गावचे..चाफळस श्रीदेवाची (रामाची) मठ स्थापन करून त्यांनीच आम्हास (भास्कर गोसावी इत्यादी शिष्य वर्गास..) भिक्षा करून उत्साह करा..असे सांगितले त्या मूळे आम्ही (भास्कर गोसावी इत्यदी शिष्य वर्ग) त्यासाठी हिंडत असतो...
हे सगळे भास्कर गोसाव्याचे वचन ऐकून शिवरायांनी दत्ताजीपंत वाकेनिविसास पत्र लिहून पाठविले कि ह्या श्रीउत्सावासाठी २०० होण प्रती वर्षी देत जावे..(दारी आलेल्या भिक्षुस दान देणे हे त्या काळी राज्याचे कर्तव्य होते..)
३) १६५८ ला खुद्द शिवराय , रामदास स्वामी कुठे राहतात.. व त्यांचे मूळ गाव विचारात होते...ह्या वरून त्यांना रामदास स्वामी कोठे राहतात.. व त्यांचे मूळ गाव कोणते ह्याची माहिती न्हवती.. असा निष्कर्ष निघतो...१६४९ लाच जर रामदास स्वामींचा अनुग्रह शिवरायांनी घेतला असता तर..हे शक्य झाले नसते,.. रामदासांचे गाव, ठिकाण माहित नसणे.. रामदासांच्या शिष्यांचीही ओळख नसणे ह्या वरून शिवरायांनी १६४९ ला रामदासांचा अनुग्रह घेतला न्हवता हे सिद्ध होते...
४) अजून एक बाब म्हणजे.. वरती शिवरायांनी दत्ताजीराव वाकेनिसास पत्र लिहिल्याचा उल्लेख आलाय... त्या वरून खुद्द शिवरायांनाच रामदास माहित नाहीत १६५८ पर्यंत..मग वाकेनिसाने शिवरायांच्या १६४९ सालीच्या अनुग्रहाबद्दल लिहिणे आणि ते खरे मानने म्हणजे मूर्ख पणाचे ठरते..
माझे मत --
१६५८ मधील वरील  पत्रावरून शिवरायांना रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य हे काय करतात , कोठे राहतात ह्याची देखील कल्पना न्हवती...मग १६४९ सालीच जर शिवरायांनी रामदास स्वामींचा अनुग्रह घेतला असता तर शिष्याला गुरु बद्दल काहीच माहिती नसणे हे आश्चर्य कारक वाटत नाही का??? पत्रावरून स्पष्ट होते कि १६५८ पर्यंत तरी शिवरायांना रामदास स्वामीच माहित न्हवते.. मग त्या आधी त्यांचा अनुग्रह घेतला वगैरे गोष्टी ह्या निव्वळ काल्पनिक आहेत..आत्ता ह्या काल्पनिक गोष्टींचा भडीमार कोणी केला.. व का केला असेल.. ह्याचे स्पष्टीकरण खाली इतर ठिकाणी केलेलेच आहे..त्या मूळे पुनोरोक्ती टाळलेली बरी..पण एक गोष्ट इथे मी आवर्जून सांगेन.. कि त्या काळी ज्यांना कोणाला (रामदासी भक्तांना) हा कल्पना विस्तार करायचा होता तो त्याने केला..पण आज तेच काल्पनिक (खोटे) असलेले मुद्दे  खरेच आहे असे भासवणारे आणि पसरवणाऱ्या आजच्या पिढीतील रामदासी भक्तांचे काय????  हे असले आजचे रामदासी भक्त  आणि मुळात हा सगळा खोटा कल्पना विस्तार करणारे वर्ण वर्चस्ववादी रामदासी भक्त ह्यांच्यात फरक तो असा किती ???? 
  
   

3 comments:

श्री.अभिजीत पाटील said...

खूप छान संग्रह आहे माहितीचा आणि खूप उपयोगी आहे . आपली परवानगी असल्यास माझ्या ब्लोग वर यातील काही लेख प्रकाशित करू शकतो का ?

कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा | said...

अभिजित, उशिरा प्रतिसाद दिल्याबद्दल माफी असावी...आपल्याला ह्या ब्लॉग वरील काही लेख तुमच्या ब्लॉग वर प्रकाशित करावयाचा असेल तर करू शकता...

Unknown said...

आपला उपक्रम स्तुत्य आहे