Wednesday, March 2, 2011

शिवरायांचे खरे गुरु...

श्री मौनी महाराज...
१) मौनी महाराज आणि शिवरायांची भेट झाल्याचा अस्सल पुरावा आहे..
२) मौनी महाराजांच्या मठाला शिवरायांनी, शंभू राजांनी, तसेच राजाराम महाराजांनी, पुढे ताराराणीनी, आणि अगदी राजश्री शाहू राज्यांनी वेळो वेळी सनदी, आणि मदत केल्याचे अस्सल दाखले आणि पुरावे आहेत...
३) शिवरायांनी दक्षिण दिग्विजय स्वारी प्रारंभ करायच्या आधी मौनी महाराजांचे दर्शन घेतले.. त्यांचा आशीर्वाद घेऊनच पुढे स्वार झाले...परत येतांना मौनी महाराजांनी समाधी घेतल्या मूळे शिवरायांची मौनी महाराजांशी भेट झाली नाही.. पण मौनी महाराजां वरील श्रद्धे पायी.. शिवरायांनी मौनी महाराजांच्या समाधी स्थानी मंदिर उभे करण्याचे आदेश दिले.. पुढे.. शिवरायांचा मृत्यू नंतर शंभू राज्यांनी मंदिराचे काम चालू ठेवले.. राजाराम महाराजांनी ते पूर्ण केले.. युद्ध सम्राज्ञी ताराराणी मासाहेब यांनीही मौनी महाराजांच्या मंदिरास मदत केलेल्या आढळून येतात.. अगदी राजश्री शाहू महाराजांनी देखील इथेच मौनी महाराजांच्या मंदिराच्या परिसरातच.. मराठ्यां साठीचे पहिले धर्म पीठ स्थापन केले...
मौनी महाराजांचे दर्शन घेतानाचे शिवराय
मौनी महाराजांच्या मठामध्ये लावलेला माहिती फलक.
   




















ध्यानस्थ अवस्थेतील  श्री मौनी महाराज 


















2 comments:

Anonymous said...

शिवरायांचे रामदास गुरु न्हवते...

Unknown said...

महाराज हे

ईश्वरा वर श्रद्धा असणारे होते

उगाच त्यांचे गुरु कोण होते किंवा नव्हते ह्या फंदात न पड़ता त्यानी काय काम केल

प्रतिकूल परस्थिति मधे लढा कसा दिला हे शिका