Sunday, October 30, 2011

आजच्या आधुनिक रामदास्यांचे "द्रव्यभोंदू" रामदास ???


आजचे आधुनिक रामदासी रामदासांना शिवरायांनी सज्जन गड दिला त्या वरून शिवराय रामदासांना किती मानत व त्यामुळे रामदास हे शिवरायांचे गुरु असा काहीसा विचित्र निष्कर्ष हि मंडळी काढतांना आंतर जालावर दिसून येतात...पण हे सांगतांना ते हे नाही सांगत कि रामदासांना सज्जन गड दिला म्हणजे काय केले...त्यांच्या नावावर केला का????  ह्या आधुनिक रामादाश्यांना हेही उमगत नाही कि किल्ला बक्षीस देणे वेगळे..आणि एखाद्या साधू संताला राहण्याची सोय करून देणे..हे वेगळे..किल्ल्यावर एखाद्या साधूची राहण्याची सोय केली तर लगेच तो किल्ला त्या साधूला देऊन टाकला असे म्हणता येणार नाही...असो...त्या रामदास्यांनी पुढील माहिती जरूर वाचावी...


"एक द्रव्याचे विकिले | एक शिष्याचे आखिले | अति दुराषण केले | दीनरूप ||२३||
जे जे रुचे शिष्यमनी | तैसाच करी मनधरणी | ऐसी कामना पापिणी | पडला गळा ||२४ 
जो गुरु भिडसारू | तो अद्धामाहून अद्धम थोरु | चोरटा भैंद पामरू | द्रव्यभोंदू || २५ || "
(संदर्भ - दासबोध - दशक ५, समास २ , श्लोक २३,२४,२५ )

ह्याचा अर्थ बघितल्यास..रामदासांनी गुरु कसा नसावा हे ह्यातून सांगितलेले आहे..काही तथाकथित गुरूंना सतत पैसे हवे असतात . त्याचे प्रकल्प कधीच संपतच  नाहीत. काही शिष्यांच्या ते अधीन राहतात . हे हवे ,ते हवेच्या हव्यासाने ते दैन्यवाणी होतात....
असा गुरु शिष्याला ज्याची गोडी वाटते तसे अनुकूल बोलून त्याची मर्जी सांभाळतो ! शिष्या कडून पूर्ण होणाऱ्या अपेक्षांवर नजर ठेवणारी कामनारूपी पापिणी त्याच्या गळ्यात पडलेली असते ...
जो गुरु शिष्याच्या भिडेने त्याची साधनेतील कुचराई सहन करतो तो अत्यंत अधम होय. शिष्याकडून होणाऱ्या लाभामुळेच अशी भीड पडत असल्याने तो गुरु चोर, नीच, पामर, द्रव्य भोंदू समजावा...
............
असे सांगणारे रामदास स्वतः शिष्याकडून मिळणाऱ्या द्रव्याचा उपभोग घेतील असे मुळीच वाटत नाही...
पण इतिहास सांगतो कि रामदास स्वामींनी शिवरायांच्या किल्ल्याचा वास्तवासाठी उपभोग घेतलेला आहे...
शिवरायांच्या देणग्याही त्यांनी त्यांच्या मठा साठी स्वीकारलेल्या आहेत...
ह्या सर्वाचा अभ्यास केला तर दोन निष्कर्ष निघू शकतात..त्यातला एकच आपल्याला सत्य मानवा लागेल...
एकतर रामदासांच्या दासबोधातील लिखानानुसारच रामदासांना द्रव्यभोंदू ठरवावे लागेल...नाहीतर शिवराय हे रामदासांचे गुरु न्हवतेच असे तरी मानावे लागेल...
माझ्या मते तरी वरील संदर्भातून रामदास हे शिवरायांचे गुरु न्हवते त्या मूळे शिवरायांनी दिलेल्या द्रव्याचा उपभोग जरी रामदासांनी घेतला असला तरी त्यांना द्रव्य भोंदू म्हणता येणार नाही..कारण शिष्यांच्या द्रव्याचा उपभोग घेऊन स्तुती करणाऱ्या गुरूला त्यांनी द्रव्य भोंदू असे म्हटलेले आहे..पण एखाद्या राज्याकडून एखाद्या साधूने मदत स्वीकारणे हे चुकीचे आहे असा त्यांचा सूर कुठे दिसून येत नाही...
वाचकांनी स्वतः ठरवावे कि नेमका कोणता निष्कर्ष ह्यातून काढावा...
गुरु ने शिष्याने दिलेल्या स्थळाचा राहण्यासाठी वापर करावा..हे गुरूच्या तत्वां मध्ये बसण्या सारखे नाही...
एखादा राजा आपल्या राज्यातील संताला, साधूला अश्या प्रकारची राहण्यासाठी एखादी जागा देऊ करत असेल तर त्या राज्याचा मान म्हणून त्या साधूने, अथवा संताने त्या जागेचा उपभोग करणे एखाद्या वेळेस समजता येऊ शकते....
अर्थात आपले मठ ज्या राज्याच्या अधिपत्या खाली आहेत त्या राज्याची मर्जी टाळणे हे प्रत्येक संताला जमेलच असेही नाही..त्या मूळे प्रत्येक साधू संता कडून अशी अपेक्षा करणे योग्य वाटत नाही..
पण निदान रामदासांनी स्वतःच सांगितल्या नुसार शिष्या कडून आलेल्या द्रव्याचा उपभोग करणे चुकीचे आहे..त्या नुसार रामदास स्वामी स्वतः दासबोधात एक लिहितील आणि आचरणात वेगळेच आणतील असे वाटत नाही...त्या मूळे शिवाजी राजे हे त्यांचे शिष्य आहेत असे रामदास स्वतः मानत नसावेत त्या ऐवजी ते शिवरायां कडे एक थोर राजा म्हणूनच पाहत असावेत त्या मूळे त्या राज्याने एखादी जागा राहण्यास दान केली तर त्याचा कृतज्ञ पणे स्वीकार करणे हे रामदासांना पटलेले असावे..तसेही रामदासांनी स्वतः शिवरायांचा उल्लेख स्वतः शिष्य म्हणून कुठेही केलेला आढळून येत नाही..त्यांनी शिवरायांना लिहिलेल्या पत्रां मध्ये शिवरायां प्रती आदरार्थीच भाषा वापरलेली आहे...
शिवरायांनी अश्या प्रकारे अनेक साधू संतांना मदत केलेली आढळून येते..त्या सगळ्याच साधू संतांना शिवरायांचे गुरु बनवणे योग्य वाटत नाही...
एखाद्या राज्याचे कर्तव्यच असते कि राज्यातील साधू, संतांना मदत करणे..स्वतः शिवरायांनी जात, धर्म न बघता साधू संतांना मदत केली हे बाबा याकुतांच्या दर्ग्याला केलेल्या मदतीवरून लक्षात येते..पण एखाद्या साधूला मदत केली म्हणून लगेच त्या साधूचे गुरुत्व त्या राज्याच्या माथी मारणे कितपत योग्य हे सुज्ञ वाचकाने स्वतः ठरवावे...
त्या मूळे आज कालची रामदाशी मंडळी रामदासांना शिवरायांनी  सज्जन गड दिला.. म्हणून नाचत असतात..त्या सर्वांनी रामदासांचा दासबोध निट डोळे फाडून पहिल्यांदा वाचून घ्यावा...
निदान रामदाशी मंडळींनी तरी दासबोध वाचलेला असावा इतरां कडून नंतर अपेक्षा करता येतील...
सज्जन गड दिला, सज्जन गड दिला असे मिरवण्याआधी त्या रामदास्यांनी स्वतः रामदासांनी दासबोधात दिलेल्या "द्रव्य भोंदूची" लक्षणे डोळ्या खालून घालावीत हि त्या रामदास्यांना माझी नम्र विनंती...

3 comments:

Unknown said...

एका बाजूला आपण रामदासाना द्रव्यभोंदू बोलता

आणि लगेच खाली लिहिता की

एकादया साधू संताला किल्ला राहायला दिला म्हणजे नावा वर करुण दिला का..??

चला नसतील रामदास शिवरायांचे गुरु पण मग साधू किंवा संत तर असतील ना..??

अहो रामदासाने किल्ल्या चा उपभोग नाही घेतला तर फ़क्त तिथे वास्तव्य केल
देनाग्या मठा साठी घेतल्या असतील पण मग मठ हे काय खाजगी प्रॉपर्टी केलि का

धार्मिक कार्यात राजां नी नाही मदत करायची तर मग कोणी करायची अब्दाली ने का..??


आता शिवाजी महाराज ज्याना साधू किंवा संत म्हणून सज्जनगढ़ वास्तव्याला देतात
त्याच साधुला आपन द्रव्य भोंदू बोलता आहात

आता हां रामदासांचा अपमान आहे का महाराजांचा अपमान आहे हे एकदाच सांगा

कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा | said...

भानूदास ,वरील पोस्ट परत एकदा नीट वाचा. मी माझे मत स्पष्ट पणे मांडलेले आहे.
शिवरायांनी राज कर्म म्हणून एखाद्या साधूला/ संताला/ फकिराला राहण्यासाठी गडावर व्यवस्था करणे, आर्थिक मदत करणे, म्हणजे तत्सम व्यक्ती महाराजांचा गुरु होतो असा अर्थ होत नाही.
राहीले अपमाना बद्दल, तर आजच्या युगातील आधूनिक रामदासी भक्तांचा फारतर अपमान होत असावा ।

Anonymous said...

रामदासाची आणि शिवाजी महाराजांची भेट कधीही झालीच नाही याचा पुरावा आहे माझ्या कड़े,अरे तो टार त्याच्या लग्नाच्या दिवशी शुभमांगल सावधान महतल्यावर लग्न मंडपटूं न पढुन् गेला..महाराजांना तो भेटला अस्ता तर महाराजांनी त्याला झोदुं काढले असते.