Thursday, August 19, 2010

सामाजिक विचार मंथन -- भाई माधवरावजी बागल भाग ३

.............'लोकांच्या त्यावेळच्या समजुतीप्रमाणे राज्याभिशेकाशिवाय राजा न्हवे'. असे असल्यामुळे त्यांनी राज्याभिषेक करवून घेतला. तथापि, शिवाजीने यापूर्वीच रायगड जिंकल्यावर ते स्थळ राजधानी म्हणून निश्चित केले व तेथे जरूर त्या इमारती बांधण्यास सुरुवात केली होती. रायगड राजधानी करावी, हा निश्चय राज्यारोहानापुर्वीच झाला होता. परंतु हा विधी समान्त्रक यथाविधी करावा व स्थापित राज्यास धर्मराज्याचे स्वरूप द्यावे, राजासही आपल्या प्रजेच्या काल्यानाप्रित्यर्थ करावयाच्या कृत्यासंबंधी राजाने स्वतःस धर्माबंधानांनी बांधून घेऊन राज्याभिषेक व्हावा हा विचार गागाभटाचा.......
......... त्याने राजास व राजाने इतरांस सांगितला. तो सर्वात मानवला व तसा राज्याभिषेक विधी झाला. अखिल भारतीय विद्वानांत गागा भटास स्थान होते, म्हणून त्याच्या कवीस प्रांतिक किंवा स्थानिकपणा राहिला नाही.  
(श्री. रा.वी.ओतूरकर.)रामदासांचे कार्य हि कल्पनेची दौड.
येथे रामदासांचा कोठेही संबंध येत नाही. पण अनेक दुष्टात्म्यांना पाहवले नाही व पाहवत नाही. ते रामदासला शिवाजीच्या डोक्यावर नेऊन बसवतातच .
.................माझा अनुभव . १९२५ सालची गोष्ट. त्यावेळी राजाराम हायस्कूल शुक्रवार पेठेत होते. त्या हायस्कूलचा हेडमास्तर अय्यर नावाचा ब्राह्मण होता. त्याने त्रैमासिक काढले होते. त्यावर चित्रकाराकडून एक चित्र काढून घेतले होते. शिवाजी व रामदास असे. रामदास उभा आहे व शिवाजी नतमस्तक होऊन त्याला प्रणाम करीत आहेत; रामदास त्यांना आशीर्वाद देत आहे तो कसा? तर त्यांच्या डोक्यावर हात ठेऊन न्हवे , तर पायाचा पंजा मस्तकावर ठेवून !!!! बेशरमपनाची परमावधि ...!!!...............
..............गुणसागर शिवाजी :........
.............हे चित्र नजरेस येताच आमच्या 'हंटर' साप्ताहिकात भरपूर हजेरी घेतली. बेळगावच्या राष्ट्रविरचे संपादक शामराव देसाई, पुण्याच्या विजयी मराठ्याचे संपादक श्रीपादराव शिंदे यांनीही खूपच हजेरी घेतली. अखेरअय्यरला माफी मागावी लागली. चित्रपटातही असाच देखावा दाखवला गेला होता. तेव्हा अमरावतीच्या नागरिकांनी तो पडदा फाडून टाकण्यास धाव घेतली.
.............. (फुले चरित्र, धनंजय कीर - २५३)
..........भारतात नवीन युग सुरु करणारा शिवाजी हा एक महापुरुष होता. रामदास शिवाजीचा गुरु आणि मार्गदाता होता. येथपर्यंत ब्राह्मण इतिहासकारांनी इतिहासातले सत्य ताणावे हे योग्य न्हवे रामदास हा चिपळूणकर - टिळक पंथाचा गुरु होता. रामदास रामोपासक होता, तर शिवाजी शिवभक्त होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याविषयक कर्तुत्वामुळे समर्थांची सल्ला मसलत न्हवती , तर गुप्तपणे मदतही सुरु होती असे म्हणण्यापर्यंत अर्वाचीन स्वयंभू किंवा संप्रदाय दीक्षित समर्थकांनी मजल मारली अशा तऱ्हेची फारच मोठी कामगिरी समर्थांच्या झोळीत टाकण्याचे कौशल्य, आपल्या कल्पनेची बेफाम दौड मारणाऱ्या अर्वाचीन समर्थ भक्तांनी दाखवली आहे. समर्थांच्या चाफळ येथील देवस्थानाला जसे शिवाजीचे शत्रू दिनायतराव आणि बाजी घोरपद्यांचे साह्य लाभले, तसे मोरयांचेहीसाह्य मिळावे म्हणून रामदास शिवारायाकडे ये - जा करीत होते. 
.............धनंजय कीर म्हणतात , ' शिवाजी हा आदर्श नेता होता. नेता हा चारित्र्यवान, त्यागी व सदाचारी असला पाहिजे, तरच तो संघटना बांधु शकतो व केडर निर्माण करू शकतो. आजचे सर्वच नेते या आदर्शाप्रत पोचू शकतील असे नाही. आजच्या नेत्यांना हे कळले पाहिजे कि राजसत्ता हि स्वतःच्या नातेवैन्कांच्यास्वार्थसिधी साठी नसते, तर ती जनतेच्या कल्याणासाठी असते....
....................... शिवाजी महाराज म्हणजे अथांग गुणांचा सागर, त्यांच्या भूतदया आणि मानवतावादावर लिहावे, नितीशास्त्रावर लिहावे, रणनीतीवर लिहावे, व्यवहारी जीवनावर लिहावे, ध्येयवाद, व्यवहार आणि मुत्सदेगिरी यावर लिहावे. त्यांचे चरित्र म्हणजे अनेक विषयांचा वस्तुपाठ.
................ तीनशे वर्षे होऊन गेली तरी शिवानामाची जादू जिवंत आहे....... ती स्फूर्ती देत आहे.
............. ...'शिवछत्रपती शिवाजी महाराज कि जय' हि घोषणा कानावर पडताच सारा खेडूत विजेचा धक्का बसल्याप्रमाणे जागा होतो. झोपी गेलेले वाघ डरकाळ्या देत बाहेर पडतात. शाहिरांचा हात नकळत डफावर पडतो. हलग्या वाजू लागतात. रणशिंग फुंकले जाते. पोरे नाचू लागतात. म्हातारे तरुण होतात. मिरवणुकीत भाग घेण्याकरिता स्त्रिया धांदल करतात..
........ उस्फूर्त गाणे अंतकरणातून बाहेर पडते.....
..................... शिवबा ये रे ये |
..................... राष्ट्ररणी व्हावयास सेनानी
..................... शिवबा ये रे ये ||
==================== (सामाजिक विचार मंथन)
----भाई माधवराव बगल
 


No comments: