Thursday, August 19, 2010

सामाजिक विचार मंथन -- भाई माधवरावजी बागल भाग २

रणजीत देसाईंची खुशामत...
........................या गटात मराठी कादंबरीकार रणजीत देसाई सामील झाला व त्याने इतिहासाची पाने ब्राह्मणांना खुश करण्याकरिता सत्याची फिरवाफिरव करून लिहिली. मराठा समाजाला अभिमान वाटेल अशी त्यांची लेखणी आहे. भाषा सोपी आहे.रचनाकौशल्य आहे. एखादी स्त्री रूपवान आहे, पण तिने ते सौंदर्य धनप्राप्ती साठी विकले असल्यास लोक तिचा तिटकाराच करतील.
......... रणजीत देसाई याने रामदासला राज्याभिषेकाला अगोदर आपल्या कादंबरीत आणला. ती कादंबरी असली तरी त्या साधनाने इतिहासाचा विपर्यास करणे हा गुन्हा आहे. पण त्याला ब्राह्मण पुढाऱ्यांकडून व त्यांच्या वर्तमानपत्राकडून गौरव करून घायचा होता तसा त्यांनी गौरव केला. रामदासाचा आशीर्वाद घेऊन तेसिंहासनारूढ झाले!!
.......................समर्थांची भेट घेऊन राजे रायगडी येत होते. महाराज म्हणतात, मोरोपंत, हत्तीवर अंबरी बरी चढवली?" राज्याभिषेकानंतर देवदर्शनाला अंबारीतून जावे लागले. त्यासाठी हत्ती सजवले. (याचा अर्थ राज्याभिषेकापुर्वी रामदासांची गाठ पडली होती असे रणजीत वर्णन करतात.) त्या कादंबरीचे पान २१५ - जिजाबाई रामदासला म्हणतात,'महाराज, आपण आलात, दर्शन घडला. महाराज काळजी वाटते शिवबाची. आम्ही निघतो. आत्ता त्याला मायेचे कोणी राहिले नाही, ती जवाबदारी आपली. आम्ही आत्ता त्याला तुमच्या ओट्यात टाकतो, त्यालासांभाळा.'
शिवबा हेच मूळी प्रजेचे पालनकर्ते होते. त्याला रामदासाच्या ओट्यात टाकण्या इतकी रामदासाची पात्रता न्हवती. हा सर्व शिवभक्तांचा व शिवाजीचा रणजीतने अपमान करून अक्षम्य गुन्हा केला आहे.
.....................'शिवाजी दि प्रगमन्तिस्त(pragmantist ) ' (के.अल.महालये, एम.ए.विदर्भ महाविद्यालय - इतिहास विभाग) लिहितात. 'शिवाजी महाराजांच्या जीवनावर कथा - कादंबऱ्या लिहून अगर चित्रपट काढून शिवभक्ती दाखवणे हे हास्यास्पद व मूर्खपणाचे होय.'
रियासतकार सरदेसाई यांनी दिलेली माहिती,- 'रामदासाची व महाराजांची राज्यारोहानापुर्वी गाठही पडली न्हवती व ओळखही न्हवती, हे पुराव्यानिशी सिद्ध होते - १६५९ नोव्हेंबरला अफजलखानाचा वाढ झाला.
.........त्यांची प्रेरणा स्वयंभू होती..............
.........अफजलखानाच्या वधापुर्वीचे म्हणजे १८ फेब्रुवारी १६५९ चे भास्कर गोसाव्याचे. दिवाकर गोसाव्यास आलेले पत्र उपलब्ध आहे. ते पुढीलप्रमाणे - मी शिवाजी राजेस भेटीस गेलो होतो. त्यांनी विचारले. 'तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी असता?' आम्ही रामदासी श्री समर्थांचे शिष्य - चाफलास राहतो' .....ते कोठे राहतात?' .......याचा सरळ अर्थ या वेळेपर्यंत शिवाजींना रामदास हे कोण माहित न्हवते.,..............
...................... पुढे केव्हा तरी रामदास महाराजांची भेट घ्यायला आले असतांना रामदास शिवाजींना खालील वाक्ये टोचून बोलले, 'तुमचे देशी वास्तव्य केले पण वर्तमान नाही घेतले' हे स्वतः रामदासाच म्हणतात. असे असतांनाराज्यारोहानाआधी रामदासाची गाठ कादंबरीत लिहून त्यात घालणे किती कृतघ्नपणा!!..........
.........गोविंद चिमणाजी भाटे म्हणतात, '- शिवाजी महाराजांनी रामदासाची गाठ पडण्यापूर्वीच स्वराज्याची स्थापना केली होती. तोपर्यंत शिवाजी महाराजांनी ज्या संघटना बांधल्या, छापे घातले, लढाया केल्या, किल्ले हस्तगत केले. जगाला थक्क करणारी रणनीती व राजकीय मुत्सदेगिरी दाखविली, तिचा व रामदासांचा काडीचाही संबंध न्हवता.'..........

.............प्रा. न.रा. फाटक म्हणतात,'शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा कोणाकडूनही घेतली न्हवती,. परिस्थितीनेच त्यांना प्रेरणा दिली..
............डॉ . आंबेडकर चरित्र, कीर, पान १४४ - ' रामदासाची सामाजिक भूमिका माणसाची मूल्य ओळखणारी नसून ती ब्राह्मणांची वर्ण वर्चस्वाची नि ब्राह्मण जातीची महती गाणारी होती. रामदासी पंथांचे लोक तर पहिल्यापासूनच जातीदुराभिमानी व कडवे म्हणून प्रसिद्ध आहेत'........
.............. आचार्य भागवत म्हणतात,'- शिवाजीच्या कर्तुत्वाचा उगम रामदासांकडे आहे, असे म्हणणे निराधार आहे. शिवाजीचे कर्तुत्व पाहूनच रामदासला राजकीय विचार सुचले, ऐरवीसुचले नसते-'............
.............. डॉ . पवार, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ म्हणतात,'-शिवाजी महाराजांना रामदासांची शिकवण होती, हि गोष्ट संपूर्ण निराधार आहे. ज्यांना शिवाजी महाराजांचे मोठेपण खपत नाही व ज्या वर्गाने त्यांच्या हयातीत त्यांना त्रास दिला , तोच वर्ग अद्याप हा उपहासाच करीत आहे. रामदासांची शिकवण शिवाजीने घेतली असती तर महाराष्ट्राने ऐक्य त्यांना केव्हाच साधता आले नसते-'.....
........रामदास हे शत्रूंचे हेर होते:
...इतकेच न्हवे तर हिंदुतील ब्राह्मणेतर अस्पृश्यांची एकी घडवून आणता आली नसती. आणि महाराष्ट्राला गुलामगिरीतून मुक्त करता आले नसते.
......वीर उत्तमराव मोहिते म्हणतात, ' रामदास हे शिवाजीचे गुरु तर मुळीच न्हवते, ते आदिलशहा व औरंगजेबाचे हेर होते. नेताजी पालकर मोगलांच्या छावणीतून गुप्तपणे निसटला आणि साताऱ्यास शिवाजीस भेटला. शिवाजीने त्याला आपल्या अधिकारात हिंदू करून घेतले,क्रांतिकारकच कृत्य होय-'  

No comments: